Chandrayaan-3 Mission Saam Tv
देश विदेश

Chandrayaan 3 Update: 'विक्रम लँडर' चंद्रावर कसे उतरणार? शेवटची २० मिनिटं ठरणार अत्यंत महत्वाची

Chandrayaan 3 update: 'विक्रम लँडर' चंद्रावर उतरवण्याची तारीख २७ ऑगस्टपर्यंत ढकलण्याची शक्यता आहे. 'विक्रम लँडर' उतरताना शेवटची २० मिनिटं अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

Vishal Gangurde

Chandrayaan 3 update:

भारताच्या चांद्रयानाकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. चांद्रयान -३ मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. चांद्रयान-३ हे चंद्राजवळ पोहोचलं आहे. भारताचं 'विक्रम लँडर' २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावेळी काही अडचण आल्यास 'विक्रम लँडर' चंद्रावर उतरवण्याची तारीख २७ ऑगस्टपर्यंत ढकलण्याची शक्यता आहे. 'विक्रम लँडर' उतरताना शेवटची २० मिनिटं अत्यंत महत्वाची ठरणार आहे. (Latest Marathi News)

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, भारताच्या चांद्रयान-३ मोहीमेचं 'विक्रम लँडर ' चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिगसाठी सज्ज झालं आहे. इस्त्रोच्या माहितीनुसार, 'विक्रम लँडर' रोजी २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यत आहे. सॉफ्ट लँडिगसाठी यंत्रणेची नियमित तपासणी केली जात आहे. मोहीमेचं निरीक्षण करणारे कॅम्पस देखील उत्साहाने आणि उर्जेने भरलेले आहे'.

चांद्रयान-३ मोहीम पूर्ण होण्यासाठी एक दिवस बाकी असताना इस्रोने चंद्राचा नवा व्हिडिओ शेअर केला आहे. ISRO ने 19 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडरच्या लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेऱ्याने घेतलेले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चंद्राच्या ७० किमी अंतरावरून घेण्यात आले आहेत. (Chandrayaan latest Marathi news)

विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिग केव्हा होणार?

अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी चांद्रयान-३ मोहीमेबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. नीलेश एम. देसाई यांनी म्हटलं की, 'चांद्रयान ३ चंद्रावर उतरण्याचा २ तास आधी लँडर आणि चंद्राच्या स्थितीचा आढावा घेऊ. त्यानंतरच आम्ही लँडर चंद्रावर उतरवण्याचा निर्णय घेऊ'. (ISRO latest Marathi news)

'लँडिगसाठी स्थिती चांगली नसल्यास लँडिगची तारीख २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलू. मात्र तरीही पहिली प्रयत्न २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर विक्रम लँडर उतरवण्याचा प्रयत्न असेल, असे ते पुढे म्हणाले. (India moon mission Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपूर रामदासपेठेतील नामांकित हॉटेलमधील एमडी पार्टीवर पोलिसांची धाड

Acidity : ॲसिडीटीपासून मिळेल त्वरित आराम, फक्त रोज प्या 'हा' एक ज्यूस

शेंगदाणा टाकून अळुचं फतफतं कसं बनवायचं? सोपी रेसिपी| Alu Fadfade Recipe

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT