The Central Government is reportedly preparing to amend IT Rules 2021 to restrict social media saam tv
देश विदेश

Social Media Ban: अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

Social Media Ban for Minor India : तुमची मुलं ही सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. तर ही बातमी नीट पाहा. अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाच्या व्यसनाधीनतेचं प्रमाण सर्वाधिक आहे. अशावेळी केंद्र सरकारनं सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्रस्त पालकांना कसा दिलासा मिळणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Snehil Shivaji

  • 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीची शक्यता

  • आयटी नियम 2021 मध्ये सुधारणा होऊ शकते

  • इकॉनॉमिक सर्व्हे 2025-26 मध्ये डिजिटल सुरक्षेवर भर

लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरानं त्रस्त असणाऱ्या अनेक पालकांसाठी ही आनंदाची बातमीये. कारण आता भारतात 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी आणण्याची सरकारनं पुरेपुर तयारी केल्याचं कळतंय. त्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी नियम 2021 मध्ये सुधारणा करुन ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मिडीया वापरावर बंदी येण्याची शक्यता आहे. यासंदर्भातच इकॉनॉमिक सर्व्हे 2025–26 मध्ये लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरासंबंधी काही सुचना करण्यात आल्या होत्या.. काय होत्या त्या सुचना पाहा.

इकॉनॉमिक सर्व्हेत सूचना

गॅम्बलिंग अॅप्स वय-आधारित मर्यादा असाव्यात

ऑटो-प्ले फीचर्स

टार्गेटेड जाहिराती

मुलांच्या हिताचा निर्णय

मुलांचे मानसिक आरोग्य

व्यसन

सायबरबुलिंग

अश्लील कंटेंट

डीपफेक

यासारख्या समस्या टाळण्यासाठी केंद्रांचं हे पाऊल अत्यंत महत्वाचं ठरु शकतं. याआधी ऑस्ट्रेलिया, फ्रान्समध्ये 15-16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्यात आलेत. त्यामुळे हा निर्णय लागू झाला तर लहानग्यांसाठी निर्णय घेणारा भारत हा जगात तिसरा देश ठरेल. या निर्णयांची अंमलबजावणी अत्यंत कठीण असली तरी हा निर्णय मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी हिताचा मानला जाऊ शकतो, कारण 15 दिवसांपूर्वी युपीतील गाजियाबादमध्ये ३ सख्या बहिणींनी ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन केलेली आत्महत्या ही सोशल मीडिया लहानग्यांच्या गळ्यातील कसा फास ठरतोय हे सांगण्यास पुरेशी आहे. त्यामुळे हा निर्णय कधी अंमलात येतोय. ते पाहणं आता महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT