modi government  Saam tv
देश विदेश

महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच सत्ताधारी आक्रमक; अवघ्या काही तासांत घेतला मोठा निर्णय

modi government : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Vishal Gangurde

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पडलं

महिला आरक्षण विधेयक २८ मतांनी पडलंय

विधयेक पडल्यानंतर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरून (१३१ वी घटनादुरुस्ती) मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. विधयेकावर सलग दोन दिवस सुरू होती. दुसऱ्या दिवशी महिला आरक्षण विधेयक हे २८ मतांनी पडलं. त्यानंतर सत्ताधारी खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली. या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सत्ताधारी खासदारांचा घोषणाबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विधेयक पडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी तातडीने उद्या म्हणजे शनिवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.

महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित १३१ वी घटनादुरुस्ती विधेयक, परिसीमन विधेयक, संघराज्य विधयेकावर चर्चा झाली. १३१ वी घटनादुरुस्तीवर चर्चा झाल्यानंतर मतदान पार पडलं. यावेळी विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली. तर विधेयकाच्या विरोधात २३० मते पडली. संविधानाच्या अनुच्छेद ३५८ अनुसार विधेयक मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश मते हवी होती. परंतु २८ मते कमी झाल्याने विधेयक पडले.

संसदीय राज्य मंत्री किरेन रिजिजू यांनी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दोन विधयेकावर चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटलं की, सरकार महिलांना अधिकार देईलच'. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी लोकसभेचं कामकाज शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित केलं.

महिला आरक्षण विधेयकांशी संबंधित १३१ वी घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली. तर विरोधात २३० मते पडली. लोकसभेत एकूण ४९८ खासदारांनी मतदान केलं. या विधयेकाला दोन तृतियांश मतांची गरज होती. विधेयक पडल्यानंतर मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणता निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आई रागवल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाने धरणात उडी मारत संपवलं आयुष्य

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक, आज कोर्टात हजर करणार

Friday Horoscope : 'या' ३ राशींना आज लागणार लॉटरी, नशिबाचे दार उघडणार; वाचा १२ राशींचे भविष्य

Friday Horoscope: या राशींच्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे, वाचा आजचं राशीभविष्य

SSC Result 2026: मोठी बातमी! दहावीचा निकाल आज जाहीर होणार; 'या' अधिकृत वेबसाईटवर पाहा तुमचे गुण

SCROLL FOR NEXT