MLA Ratnakar Gutte Fraud Case Saam Tv
देश विदेश

New Delhi : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात FIR दाखल; ४०९ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी CBIची कारवाई

सीबीआयने ( केंद्रीय अन्वेषण विभाग) कथित ४०९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टे आणि कुटुंबातील सदस्यांविरोधात एफआयर दाखल केला आहे.

सूरज सावंत

New Delhi News : सीबीआयने ( केंद्रीय अन्वेषण विभाग) कथित ४०९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टे आणि कुटुंबातील सदस्यांविरोधात एफआयर दाखल केला आहे. सीबीआयने रत्नाकर गुट्टे यांच्यासहित गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडच्या विरोधात एफआयर दाखल केला आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून निवडूण आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार गुट्टे अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून निवडूण आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, त्यांच्या मुलगा आणि कुटुंबातील सदस्यांविरोधात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. गुट्टे हे गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालकापैकी एक आहे.

रत्नाकर गुट्टे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे की,  त्यांच्या कंपनीने युको बँकेच्या मुदत कर्ज आणि इतर पत सुविधांच्या रूपात ५७७.१६ कोटी रुपयांच्या विविध क्रेडिट सुविधा कर्जाच्या स्वरूपात घेतले.

दरम्यान, सीबीआयने ४०९ कोटी रुपयांच्या बँक (Bank) फसवणुकीप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्राचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि कुटुंबाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी काल सीबीआयने (CBI) ५ ठिकाणी छापे टाकले होते. नागपुरातील २ ठिकाणी छापे टाकले होते. तर परभणीच्या तीन ठिकाणी छापे टाकले होते.

ईडीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रत्नाकर गुट्टे आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड यांच्याविरुद्ध कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. गुट्टे् यांच्या कंपनीने कथित बँकाची कर्जे मंजूर उद्देशांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरली गेली असल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT