Viral Video Saam TV
देश विदेश

Bride Threw Money Viral Video: भावा आपल्याला पण अशीच पाहिजे; भर मांडवात नवरदेवाला पाहून नवरीनं केली नोटांची उधळण

Wedding Ceremony Viral Video: लग्न म्हटल्यावर भरसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.

प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे. (Bride Video)

लग्नात वरातीमध्ये नवरी अथवा नवरदेव यांच्यावर पैसे ओवाळून टाकतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. तुमच्या लग्नात अथवा ओळखीच्या एखाद्या व्यक्तीच्या लग्नात तुम्ही देखील अशा प्रकारे १०० ते २०० ची एखादी नोट ओवाळून टाकली असेल. मात्र एका नवरीने आपल्याला हवा तसा पती मिळाला या आनंदात लाखोंच्या घरात पतीवर पैशांची उधळन केली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नवरी आपल्या लग्नात खुप खूश आहे. लाल रंगाचा पोशाख यावेळी नवरीने परिधान केला आहे. तर सफेद रंगाच्या शेरवानीत नवरदेव तिच्या समोर उभा आहे. दोघांचाही शाही विवाहसोहळा पाहण्यासाठी पाहुण्यांची गर्दी जमा झालीये. अशात नवरीची एन्ट्री होताच ती सर्वांसमोर येऊन आपल्या नवरदेवावर पैशांची उधळन करते.

१०० ते २०० नाही तर ही नवरी चक्का ५०० च्या नोटांचे बंडल नवरदेवावर उधळत आहे. नवरा नवरीवर लग्न (Wedding) झाल्यानंतर सर्वजण ज्या पद्धतीने पुष्पांची उधळन करतात अगदी त्याच पद्धतीने ही नवरी पैशांचे बंडल उधळत आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायर होत आहे. काही मुलांनी यावर कमेंट करत म्हटलं आहे की, आपल्याला सुद्धा अशीच नवरी हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT