Uttarakhand passenger bus falls into gorge Saam TV Marathi News
देश विदेश

Accident : उत्तरखंडमध्ये भयंकर अपघात, बस दरीत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Almora bus accident today morning : उत्तराखंडमधील अल्मोडा येथे प्रवाशांनी भरलेली बस भिकियासैन-विनायक रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू, अनेक जखमी.

Namdeo Kumbhar

Uttarakhand passenger bus falls into gorge : उत्तराखंडमधील अल्मोडामध्ये झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झालाय. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली अन् क्षणात होत्याचं नव्हते झाले. आज सकाळी भिकियासैन-विनायक रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवासी बसवरील चालकाचे निंयत्रण सुटल्याने दुर्घटना घडली. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे पसरली. घटनास्थळावर बचाव कार्य वेगात सुरू करण्यात आलेय. मृतदेहाची ओळख पटवण्यात येत आहे, तर जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय.

भिकियासैन-विनायक-जलाली रोडवर शिलापाणीजवळ आज सकाळी अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस भिकियासैनहून रामनगरला जात होती. सकाळी ६ वाजताच्या सुमारास द्वारहाटहून निघाली. शिलापाणीजवळ आल्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती खोल दरीत कोसळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना भिकियासैन येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बस दरीत कोसळल्याची माहिती मिळताच पोलील, एसडीआरएफ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटानस्थळावर तात्काळ बचावकार्य करण्यात आले. बसमधून अनेकांना वाचवण्यात आले आहे. जखमींना तात्काळ प्राथमिक उपचार करून रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आपत्ती अधिकारी विनीत पाल यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्य जलदगतीने सुरू आहे आणि जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणचा अमेरिकेवर मोठा हल्ला; 2500 कोटींची रडार यंत्रणा उद्ध्वस्त, जगात तिसरे महायुद्ध? VIDEO

Maharashtra Live News Update: धुळ्यातील 25 जण दुबईमध्ये अडकले

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर हल्ला; तब्बल १०१ जण बेपत्ता, बचाव कार्य सुरू

मुख्यमंत्र्यांची वर्णी राज्यसभेवर? राज्याचे उपमुख्यमंत्री बदलणार; देशाच्या राजकारणाला हादरा

Thursday Horoscope: खर्च वाढेल, अपूर्ण कामं पू्र्ण होतील; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT