Bus Accident News  Saam TV
देश विदेश

Bus Accident News : गुजरातमध्ये SRP जवानांच्या बसला भीषण अपघात, 38 जवान जखमी

Jawan Injured in Bus Accident in Gujrat : गुजरातच्या पंचमहल येथे ही अपघाताची घटना घडली आहे.

प्रविण वाकचौरे

Bus Accident News :

गुजरातमधून मोठ्या बस अपघाताची घटना समोर आली आहे. राज्य राखीव दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला हा अपघात झाला आहे. अपघातात बसमधील ३८ जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या पंचमहल येथे ही अपघाताची घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील सर्व जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

फायरिंग प्रॅक्टिसवर परतताना जवानांच्या बसला हा अपघात झाला. बसचा ब्रेक फेल झाल्याने बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका तीव्र वळणारवर हा अपघात झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारासाठी दाखल झालेल्या ३८ जवानांपैकी २९ जवानांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ९ जवान गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहे. सर्वांवर वडोदरा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT