anganwadi saam tv
देश विदेश

Anganwadi Jobs: अंगणवाडीत बंपर भरती! ५ वी ते १२ वी पास महिला करु शकतात अर्ज; वाचा संपूर्ण प्रोसेस

Anganwadi Jobs Update: अंगणावाडीत मोठी भरती निघाली आहे. दरम्यान या पदांसाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या.

Ankush Dhavre

अंगणवाडीमध्ये ६५०० पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी ५ वी ते १२ वी उत्तीर्ण असलेल्या महिलांना अर्ज करता येणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा देखील असणार आहे. ४० पेक्षा कमी वय असलेल्या महिलांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान या पदासाठी अर्ज करण्याची पात्रता, निकष आणि प्रोसेस काय? जाणून घ्या.

ही अंगणवाडी भरती उत्तराखंड राज्यासाठी असणार आहे. या राज्यातील महिला सशक्तिकरणासाठी एकूण ६५०० पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. यापैकी ६१८५ पदं ही अंगणवाडी सहाय्यकेसाठी असणार आहे. तर ३७४ पदं ही ३७४ पदं ही अंगणवाडी कार्यकर्त्यांची आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या पदांसाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतील.

कोणाला अर्ज करता येणार?

या पदासाठी अर्ज करण्यासाठी शिक्षणाची अट असणार आहे. या पदासाठी केवळ महिलांना अर्ज करता येणार आहेत. ज्या महिला मान्यता प्राप्त बोर्डातून १० किंवा १२ वी पास उत्तीर्ण असतील, अशा महिला या पदासाठी अर्ज भरण्यास पात्र आहेत. तर अंगणवाडी सहाय्यीका पदासाठी पाचवी पास महिला सुद्धा अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय १८ ते ४० च्या मध्ये असावं.

केव्हा सुरु होणार?

उत्तराखंड अंगणवाडी भरती प्रक्रिया २ जानेवारी २०२५ पासून सुरु झाली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ असणार आहे. जर तुम्हालाही या पदासाठी तुम्हालाही अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला ३१ जानेवारीच्या आधी अर्ज करावा लागेल. तुम्ही www.wecduck.in वर जाऊन अर्ज करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mantralaya Bribe Case: एक लाईन म्हणजे 50 हजार, दोन लाईन म्हणजे...; मंत्रालयातील लाचखोरीचं रेट कार्ड व्हायरल

Maharashtra Live News Update : . कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार

Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

Raja Shivaji: हातात भगवा, नजरेत ज्वाला…; शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची दमदार झलक समोर

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील डान्स|Video Viral

SCROLL FOR NEXT