Nirmala Sitaraman Union Budget  Saam Tv
देश विदेश

Budget 2023: अर्थसंकल्प कुठे पाहता येईल? अर्थसंकल्पाच्या भाषणाची संपूर्ण कॉपी मोबाईलवरही मिळेल

India Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल.

प्रविण वाकचौरे

Union Budget 2023: अवघ्या देशाचं लक्ष असलेला अर्थसंकल्प २०२३ काही तासात मांडला जाणार आहे.आज देशाच्या नजरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या भाषणाकडे असतील. अर्थमंत्री अर्थसंकल्पाच्या दिवशी काय करतात आणि संपूर्ण दिवसाचे त्यांचे वेळापत्रक काय असेल याबाबत जाणून घेऊया.

सकाळी ९.२५ अर्थमंत्री बजेटवर राष्ट्रपतींची मंजुरी घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात जातील आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. येथे राष्ट्रपती अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी देतील. सकाळी १० वाजता अर्थमंत्री संसदेत पोहोचतील. सकाळी १०.१० वाजता अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यामध्ये अर्थसंकल्पावर मंत्रिमंडळाची अधिकृत मान्यता घेतली जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळी ११ वाजता अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. दुपारी ३ वाजता अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, अर्थमंत्री दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेतील, ज्यामध्ये त्या अर्थसंकल्पातील घोषणांवर बुलेट पॉइंट्स देतील आणि माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देतील.

बजेट कुठे पाहता येईल?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल, तुम्ही ते संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर हे भाषण थेट पाहू शकता. यासोबतच अर्थसंकल्प लाईव्ह तुम्ही साम टीव्हीच्या युट्यूब चॅनेल https://www.youtube.com/watch?v=s8T1MaWFS9c वर पाहू शकता.

संपूर्ण बजेट PDF मध्ये मिळेल

Union Budget मोबाइल अॅपला भेट देऊन तुम्ही बजेटची कागदपत्रे पाहू शकता. हे अॅप दोन भाषांमध्ये असून इंग्रजी आणि हिंदी भाषेतून तुम्ही बजेटशी संबंधित सर्व तपशील मिळवू शकता. हे Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सामान्य अर्थसंकल्पाच्या www.indiabudget.gov.in या वेब पोर्टलला भेट देऊनही हे अॅप डाउनलोड केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT