Budget 2023 saam tv
देश विदेश

New Income Tax Slab Budget 2023 : मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना मोठं 'गिफ्ट'; ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Union Budget 2023: ९ लाखांपर्यंत उत्पन्न असल्यास ४५ हजार कर द्यावा लागणार.

Chandrakant Jagtap

Budget 2023 Income Tax : केंद्र सरकारने 2023 चा अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या बजेटमधून मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला खूश करणाचा प्रयत्न अर्थमत्र्यांनी केला आहे. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात दिलासा मिळण्याची मध्यमवर्गीयांना होती. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर रचनेत बदल करत मध्यमवर्गीयांना दिसाला दिला आहे.

प्राप्तिकराच्या संदर्भात अर्थमंत्री सीतारामण यांनी जाहीर केलेल्या नवीन कर प्रणालीअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सवलत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही सूट ५ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होती. आता 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही. पगारदारांना याचा फायदा होणार आहे.

मोदी सरकारने अर्थसंकल्पात आयकर रचनेत मोठा बदल केला आला आहे. ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल असे सांगताना अर्थमंत्र्यांनी नवी कर प्रणाली जाहीर केली आहे. त्यानुसार त्यानुसार ३ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. ३-६ लाखांपर्यंत उत्पन्न असल्यास ५ टक्के कर द्यवा लागेल.

नव्या करप्रणालीनुसार ६ ते ९ लाख उत्पन्नावर १० टक्के कर लागणार असून ९ ते १२ लाख उत्पन्नावर 15 टक्के कर द्यावा लागले. त्याचप्रमाणे 12 ते 15 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर लागणार असून 15 लाखांच्या पुढील उत्पन्नावर 30 टक्के कर लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni: 'परमसुंदरी' अप्सरा सोनाली कुलकर्णीचा नवा लूक, पाहून मन होईल घायाळ

Maharashtra Live News Update: Parbhani: बस आणि पिकअपचा भीषण अपघात, बस झाली पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही

karishma kapoor Children: करिश्मा कपूरच्या घरातील वाद चव्हाट्यावर; ३००० कोटींच्या वादात संजय कपूरच्या बहीणीची एन्ट्री

Torna Fort History: ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध, भव्य वास्तुकला आणि नैसर्गिक आकर्षण, तोरणा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Tharala Tar Mag : सायलीच्या आयुष्यात पुन्हा येणार 'प्रिया' नावाचे वादळ, मालिकेत पुढे काय घडणार? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT