Britain Queen Elizabeth Death saam tv
देश विदेश

Breaking News : महाराणी एलिझाबेथ यांचं निधन!

ब्रिटनमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Britain Queen Elizabeth Death : ब्रिटनमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बॅकिंघम पॅलेसने केलेल्या अधिकृत ट्विटमध्ये ही दु:खद माहिती देण्यात आली आहे.

आज एलिझाबेथ यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय निरीक्षणात ठेवलं होतं. महाराणीच्या आरोग्याबाबत बकिंघम पॅलेसकडून निवेदनही जारी करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या निधनानंतर इंग्लंडचे पंतप्रधान लिज ट्रस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

राणी एलिझाबेथ यांची कारकीर्द

महाराणी एलिझाबेथ यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ साली लंडनमध्ये झाला होता. २० नोव्हेंबर १९४७ साली त्यांनी ग्रीक आणि डेन्माक्रचे राजकुमार प्रिन्स फिलिप यांच्याशी त्यांचा विवाह केला. नोव्हेंबर १९४८ साली त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाचे नाव प्रिन्स चार्ल्स ठेवण्यात आले. ६ फेब्रुवारी १९५२ साली वडिलांच्या मृत्युनंतर त्या एलिझाबेथ महाराणी झाल्या.

२ जून १९५३ रोजी एलिझाबेथ यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांना राणीचा मुकट घालण्यात आला. ६ फेब्रुवारी २०१२ रोजी एलिझाबेथ यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केली. या दिवशी त्यांचा हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. ९ सप्टेंबर २०१५ साली इंग्लंडवर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या एलिझाबेथ पहिल्या महिला सम्राज्ञी ठरल्या. ९ एप्रिल २०२० रोजी त्यांचे पती पिन्स विल्यम्स यांचे निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT