Brij Bhushan Singh Yandex
देश विदेश

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; लैंगिक शोषण प्रकरणात १८ एप्रिलला न्यायालय देणार निकाल

Brij Bhushan Singh: भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. या प्रकरणी मागील वर्षाच्या जून महिन्यात दिल्ली पोलिसांनी चार्जशीट दाखल केली होती.

Bharat Jadhav

Brij Bhushan Sharan Singh case :

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या प्रकरणी सुनावणी करताना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवलाय. न्यायालय १८ एप्रिलला तो निकाल देणार आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.(Latest News)

काही अल्पवयीन महिला पैलवान खेळाडूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्यावर पॉक्सो कायद्या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अल्पवयीन खेळाडूने तक्रार मागे घेतली होती. तक्रार मागे घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तक्रारदाराचा जबाब नोंदवून तक्रार रद्द करण्याचा अहवाल दाखल केला होता.

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी म्हटलं होतं की त्यांनी रागाच्या भरात ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची क्लोजर रिपोर्ट तयार केली. तर दुसरीकडे महिला कुस्तीपटू या प्रकरणात पुरेसे पुरावे देण्यात अपयशी ठरल्या. असं दिल्ली पोलिसांनी कोर्टात ११०० ते १२०० पानांच्या आरोपपत्रात सांगितलं. यासोबतच पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर दाखल केलेला POCSO खटला मागे घेण्यासाठी ५५० पानांचा रद्दीकरण अहवालही दाखल केला.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कोणतेही तांत्रिक पुरावे मिळाले नाहीत. तपासादरम्यान पोलिसांना कोणताही संशयास्पद फोटो, व्हिडिओ किंवा फुटेज किंवा कोणताही फॉरेन्सिक पुरावा सापडला नाही. पोलिसांनी महिला कुस्तीपटूंकडून पुरावेही मागितले होते, मात्र ते देऊ शकले नसल्याचं दिल्ली पोलिसांनी आपल्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ८,७०० रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; बड्या नेत्याच्या निधनाने राजकारणात हळहळ

Gokul Election Result: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला झटका, सतेज पाटील यांच्या एकाकी झुंजेला यश, वाचा विजयाची इनसाईड स्टोरी

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर

Heart Blockage: लिंबू-आल्याचं पाणी प्यायल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीशिवाय कसे ठीक कराल ब्लॉकेज?

SCROLL FOR NEXT