lucknow Bride Died Due To Heart Attack On Stage Saam TV
देश विदेश

Viral Video: लग्नमांडवात शोककळा; वरमाला घालताच नवरीचा मृत्यू, दुर्देवी घटनेनं हळहळ

lucknow Bride Died Due To Heart Attack On Stage: वधू्नेही वराच्या गळ्यात वरमाला टाकली. मात्र, काही क्षणातच धक्कादायक प्रसंग घडला आणि लग्नसोहळा हा दुखःसोहळा बनला.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

lucknow Viral Video: लग्नमांडव सजला होता. सनई-चौघडे वाजत होते. नववधू आणि वर आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण जगत होते. दोघांचेही नातेवाईक आणि वराती नवदाम्पत्याला आशीर्वाद देत होते. सगळं काही प्रसन्नमय होतं, अशा सुखद वातावरणात परंपरेप्रमाणे वधू-वर हे एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालण्यासाठी उठले. दोघेही समोरासमोर आले आणि वराने वधूच्या गळ्यात वरमाला टाकली. त्यानंतर वधू्नेही वराच्या गळ्यात वरमाला टाकली. मात्र, काही क्षणातच धक्कादायक प्रसंग घडला आणि लग्नसोहळा हा दुखःसोहळा बनला. (bride died due to heart attack on stage)

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधून ही विचित्र बातमी समोर आली आहे. एका वराने वधूच्या गळ्यात वरमाला घालताच वधूचा (Bride) मृत्यू झाला आहे. मलिहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदवाना गावात ही घटना घडली. इथे वास्तव्यास असलेल्या शिवांगीचा विवाह सोहळा सुरू होता. त्यावेळी लग्न मंडपात शिवांगीनं अखेरचा श्वास घेतला.

पाहा व्हिडिओ -

नवरा-नवरी स्टेजवर एकमेकांसमोर आले. विवेकनं शिवांगीच्या गळ्यात हार घातला. आता शिवांगी हार घालणार होती. शिवांगीनं विवेकच्या गळ्यात हार घातला आणि दुसऱ्याच क्षणी ती कोसळली. शिवांगीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला तपासलं आणि मृत घोषित केलं. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यानं शिवांगीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

नवरीचा मृत्यू झाल्याचं समजताच मंडपात जमलेल्यांवर शोककळा पसरली. अवघ्या काही मिनिटांमध्ये आनंदाची जागा दु:खानं घेतली. शिवांगीची आई कमलेश कुमारी, लहान बहिण सोनम आणि भाऊ अमितची अवस्था अतिशय बिकट आहे. विवेकलादेखील जबर धक्का बसला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, निवडणुकीत पैसे वाटल्याचा वैभव नाईकांचा आरोप; VIDEO चर्चेत

Maharashtra Nagar Parishad Live : बदलापूरमध्ये वातावरण तापलं, भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

Chaturgrahi Yog In Dhanu: ५० वर्षांनंतर बनणार चतुर्ग्रही योग; या राशी मानसन्मानासह रातोरात कमावणार पैसा

शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगरांकडून मतदान करताना नियमांचे उल्लंघन, बूथवर 'त्या' महिलेला नेमकं काय सांगितलं?

Amboli Recipe: मऊ लुसलुशीत आंबोळी रेसिपी कशी बनवायची ?

SCROLL FOR NEXT