NIA Raid Saam Tv
देश विदेश

NIA Raid: ब्रेकिंग! एनआयएकडून देशभरात ११ ठिकाणी छापेमारी; रामेश्वरम कॅफे प्रकरणात कारवाई

NIA Raid: राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून देशभरातील जवळपास ११ ठिकाणी छापेमारी केल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बाँम्बस्फोट प्रकरणात ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २१ मे २०२४

राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून देशभरातील जवळपास ११ ठिकाणी छापेमारी केल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बाँम्बस्फोट प्रकरणात ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. एनआय या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत भीषण स्फोट झाला होता. याच संदर्भात चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने विविध राज्यांमध्ये छापे टाकले. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी ही छापेमारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या स्फोट प्रकरणात मुसावीर हुसेन शाजीब आणि स्फोटामागील सूत्रधार अब्दुल मतीन ताहा या दोघांना याआधीच अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीवरुन ही छापेमारी केल्याचे सांगण्यात येत आहे. या छापेमारीच्या ठिकाणांबाबत तपास यंत्रणेने गुप्तता पाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

SCROLL FOR NEXT