Iran Attacks in Pakistan Saam TV
देश विदेश

Iran Strike in Pakistan: इराणचा पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचा सर्वात मोठा अड्डाच उडवला

Iran vs Pakistan: इराणने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवादी संघटना जैश अल-अदलचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.

Satish Daud

Iran Attacks in Pakistan

पाकिस्तानच्या हद्दीतून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांनी त्रस्त झालेल्या इराणने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. इराणने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवादी संघटना जैश अल-अदलचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या सर्जिकल स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा इराणी सैन्याने केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानने मात्र यात निष्पाप लोकांचा जीव गेल्याचं म्हटलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या लष्कराने मंगळवारी (१६ जानेवारी) रात्री पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या भागात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. या भागात दहशतवादी संघटना जैश-अल-अदलचे सर्वात मोठे मुख्यालय होते. या मुख्यालयासह दहशतवाद्यांचा आणखी एक अड्डा उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणच्या वतीने करण्यात आला आहे.

मागील काही महिन्यांपासून इराणी सैन्य आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-अल-अदल यांच्यात चांगलीच चकमक सुरू आहे. सुरुवातीला जैश अल-अलदने इराणच्या सीमाभागात दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांनंतर इराणने पाकिस्तानला बजावले देखील होते. (Latest Marathi News)

मात्र, तरी देखील जैश अल-अलदकडून इराणवर दहशतवादी कारवाया सुरूच होत्या. गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी इराणच्या सिस्तान-बलूचिस्तानमधील एका पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. ज्यात १४ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

याचाच बदला म्हणून इराणने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर मंगळवारी रात्री क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचं इराणी माध्यमांनी म्हटलं आहे. दुसरीकडे इराणने केलेल्या बेछूट हल्ल्यात २ निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर ३ मुली जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

Famous Historic Places : 'या' किल्ल्याच्या भिंतीवरून दिसतो ताजमहलचा सुंदर नजारा, तुम्ही कधी पाहिलाय का?

Actor Weight Loss Tips: प्रसिद्ध अभिनेत्याने एका महिन्यात कमी केलं ७ किलो वजन; फॉलो केले हे सोपे नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

SCROLL FOR NEXT