restaurant collapses in Majorca:  Saamtv
देश विदेश

Spain Restaurant Collapses: रेस्टॉरंटचे छत कोसळून मोठी दुर्घटना! ४ जणांचा मृत्यू, २०हून अधिक जखमी; बचावकार्य सुरू

restaurant collapses in Majorca: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबले असण्याची शक्यता आहे.

Gangappa Pujari

स्पेनमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. स्पेनमधील मल्लोर्का येथे एका रेस्टॉरंटचे छत कोसळल्याची घटना घडली. या भीषण दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असल्याची शक्यता असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्पेनमधील मालोर्का बेटावरील समुद्रकिनार्‍यावर असलेल्या रेस्टॉरंटचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून २०हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून बचावकार्य सुरू आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांना पाल्मा येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबले असण्याची शक्यता आहे, अशी माहिती बचावकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली.

दरम्यान, जास्त वजनामुळे छत कोसळले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रात्री आठच्या सुमारास पहिला फोन आला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT