MP Suspended From Parliament Saam TV
देश विदेश

Breaking News: निलंबित १४१ खासदारांना संसदेत प्रवेशबंदी; लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक जारी

MP Suspended From Parliament: निलंबित खासदारांना आता संसदेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सचिवालयाने याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे.

Satish Daud

MP Suspended From parliament 

संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. दरम्यान, या निलंबित खासदारांना आता संसदेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सचिवालयाने याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निलंबनासोबत संसदेत प्रवेशबंदी करण्यात आल्याने खासदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तेरावा दिवस आहे. अधिवेशन संपण्यासाठी काहीच दिवस बाकी असताना सत्ताधारी पक्षांच्या अनेक खासदारांच्या केलेल्या निलंबनामुळे हे अधिवेशन चांगलं चर्चेत आलं आहे.

आज विरोधी पक्ष संसदेतून केलेल्या १४१ खासदारांचे निलंबनावरून आक्रमक राहणार आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष हा उपराष्ट्रपती यांच्याबद्दल केलेल्या विरोधी पक्षातील खासदारांच्या कृत्यामुळे आक्रमक होण्याची शक्यता आहे.

खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभागृहाच्या बाहेर उपराष्ट्रपती जयदीप धनगड यांची केलेली नक्कल यावरून सत्ताधारी पक्ष कालपासूनच टीकेची झोड उठवत आहे. तोच धागा पकडत आज देखील सत्ताधारी पक्ष आक्रमक राहणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता पाहता, लोकसभा सचिवालयाने निलंबित खासदारांसाठी परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात संसद भवन, लॉबी आणि गॅलरीमध्ये येण्यापासून निलंबित खासदारांना बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT