Gujarat Factory Wall Fell Down Saam Tv
देश विदेश

मोठी बातमी! गुजरातमध्ये मीठ कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू

गुजरातमधील मोरबी येथे एक मोठी दुर्घटना घडली. येथील हलवड जीआयडीसीमध्ये मीठ कारखान्याची भिंत कोसळली आहे.

वृत्तसंस्था

गुजरातमधील मोरबी येथे एक मोठी दुर्घटना घडली. येथील हलवड जीआयडीसीमध्ये मीठ कारखान्याची भिंत कोसळली आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. अजूनही 15 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोरबीच्या मीठ कारखान्यात झालेल्या दुर्घटनेनंतर या घटनेचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. भिंत पडल्याने तिथल्या मिठाच्या गोण्या खाली पडल्याचे दिसून येते. त्यात अनेक लोक गाडले गेले आहेत.

स्थानिक लोक आणि कारखान्याचे कामगार भिंतीवरील मलबा आणि पोत्या काढून खाली गाडलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. तर जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने 12 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. ढिगाऱ्याखाली आणि पोत्यांखाली आणखी लोक दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT