Rajasthan Crime News  Saam Tv
देश विदेश

Crime : गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बोलावलं अन् मित्रांच्या स्वाधीन केलं; काळिमा फासणारी घटना

नराधम प्रियकराने प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने अज्ञात स्थळी बोलावलं. तिथे हजर असलेल्या आरोपीच्या दोन मित्रांनी पीडितेवर वारंवार बलात्कार केला.

साम टिव्ही ब्युरो

Rajasthan Crime News : लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधून (Rajasthan) उघडकीस आली. नराधम प्रियकराने प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने अज्ञात स्थळी बोलावलं. तिथे हजर असलेल्या आरोपीच्या दोन मित्रांनी पीडितेवर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा (Crime) दाखल केलाय. तिघेही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणीचे एका अरबाज धोबी नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. अरबाजने पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण सुरू केलं. पीडितेने लग्नासाठी विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली.

जेव्हा पीडितेने ही गोष्ट कुटुंबीयांना सांगण्याची धमकी दिली तेव्हा अरबाजने तिला अज्ञातस्थळी बोलावलं. अरबाजच्या सांगण्यावरून पीडिता त्याला भेटण्यासाठी गेली असता, तिथे उपस्थित असलेल्या इतर दोन आरोपींनी तिचं अपहरण करत जंगलात नेलं. त्याठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला.

धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा आरोपीचे मित्र तरुणीवर बलात्कार करत होते तेव्हा आरोपी अरबाज त्यांना प्रोत्साहित करत होता. बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेला तिथेच सोडून दिलं. त्यानंतर पीडितेने आपलं घर गाठत कुटुंबीयांना आपबिती सांगितली.

यानंतर पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तिनही आरोपींविरोधात अपहरण तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्याची माहिती आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT