UP Moradabad Crime News saam tv
देश विदेश

Boyfriend Poisoned Girl: प्रेयसीला भेटायला बोलवलं, विष पाजलं... बेशुद्ध अवस्थेत घराच्या दरवाजावर नेऊन सोडलं

UP Moradabad Crime News: प्रेयसीला भेटायला बोलवून विष पाजलं आणि नंतर तिला तिच्या घराच्या दरवाजावर बेशुद्ध अवस्थेत नेऊन सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Chandrakant Jagtap

Boyfriend Gave Poison To Girlfriend: प्रेयसीला भेटायला बोलवून विष पाजलं आणि नंतर तिला तिच्या घराच्या दरवाजावर बेशुद्ध अवस्थेत नेऊन सोडल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या कुटुंबियांनी बॉयफ्रेन्डविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मुरादाबाद जिल्ह्यातील मुगलपुरा कोतवाली भागात राहणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांनी अमन अन्सारी नावाच्या तरुणावर त्यांच्या मुलीला विष देऊन ठार केल्याचा आरोप केला आहे. नातेवाईकांनी मुलीच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी तरुणाशी झालेल्या संभाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील कुटुंबियांनी पोलिसांना दिले आहे. त्यात मृच तरुणी आरोपी अमन अन्सारीवर तिला ब्लॅकमेल करून विष पाजून तिची हत्या करण्याचा आरोप करत आहे. सध्या कुटुंबीयांच्या आरोपावरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Bihar Crime News: धक्कादायक! आईने आणि भावाने दिली प्रेमाची क्रूर शिक्षा, हत्येनंतर मुलीचा मृतदेह घरातच पुरलापालकांनी रुग्णालयाऐवजी आधी पोलिसांत नेले

अलिशा असे मृत मुलीचे आहे. २० जुलै रोजी सायंकाळी आरोपी अमन अन्सारी हा अलिशाला बेशुद्धावस्थेत तिच्या घराच्या दारात सोडून पळून गेला. त्यानंतर कुटुंबियांनी अलिशाला ई-रिक्षात बसवून कोतवाली मुघलपुरा येथे नेऊन पोलिसांकडे मदतीची याचना केली. मात्र त्यांना मदत करण्याऐवजी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आधी मुलीवर उपचार करून घ्या, तक्रार नंतरही दाखल केली जाऊ शकते असे सांगितले. (Tajya Marathi Batmya)

नातेवाइकांनी मोबाईलमध्ये नोंदवला जबाब

यानंतर कुटुंबीयांनी अलीशाला ई-रिक्षातून जिल्हा रुग्णालयात नेले आणि तिच्यावर उपचार सुरू केले. अलीशाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबीयांनी कोतवाली मुघलपुरा गाठून अनेकवेळा पोलिसांना अलिशाचा जबाब नोंदवण्याची विनंती केली. असे असतानाही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असा आरोप करण्यात आला आहे. यानतंर कुटुंबीयांनीच मोबाईलवरून तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून अलिशाचा जबाब घेतला. मृत्यूच्या काही वेळापूर्वी अलीशाने सांगितले की अमन अन्सारी तिला ब्लॅकमेल करत होता आणि त्यानेच तिला विष पाजले. (Latest Political News)

अलिशाचे पोस्टमॉर्टम योग्य पॅनेलसमोर - पोलीस

या प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसएसपी मुरादाबाद यांनी सांगितले की अलिशाचे पोस्टमॉर्टम योग्य पॅनेलसमोर केले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास कार्यक्षेत्र कोतवाली सदरकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुण अमन अन्सारी याचीही चौकशी सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT