Kiss Of Death Crime News Saam Tv
देश विदेश

गर्लफ्रेंडने किस करताच बॉयफ्रेंडचा क्षणात मृत्यू; हादरवून टाकणारी घटना

प्रेयसीने किस करताच प्रियकराचा मृत्यू झाला.

Satish Daud

मुंबई : गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या नात्यात Kiss ही एक कॉमन गोष्ट आहे. जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर आपुलकी व्यक्त करण्यासाठी आपण किस करतो. पण कधी किस केल्याने एखाद्याचा जीव गेल्याची घटना तुम्ही ऐकली आहेत का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण, अशी एक विचित्र घटना अमेरिकेत (America) घडली आहे. अमेरिकेत एक महिला जेलमध्ये असलेल्या आपल्या प्रियकराला भेटायला गेली. तिथे तिने त्याला Kiss केला. पण किस करताच प्रियकराचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतलं असून तिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील टेनेसी येथील एक ३३ वर्षीय महिला जेलमध्ये तिच्या प्रियकराला भेटायला गेली होती. जेव्हा ती जेलमध्ये गेली तेव्हा तिने तोंडात ड्रग्ज लपवले होते.

ज्यावेळी तिने तिच्या प्रियकराला Kiss केला, तेव्हा हे ड्रग्ज त्याच्या तोंडात गेले. ड्रग्ज तोंडात गेल्यानंतर प्रियकराने ते न कळत गिळले आणि तो बेशुद्ध झाला. दरम्यान, पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला असा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.

दरम्यान अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी ३३ वर्षीय महिलेला अटक केली. तिची चौकशी केली त्यावेळी आपणच प्रियकराला ड्रग्ज दिले असल्याची कबूली तिने दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक केली असून तिच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

३३ वर्षीय महिलेचा प्रियकराला ११ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. दरम्यान, त्याला ड्रग्जचं व्यसन असल्यानं त्याची प्रेयसी त्याला ड्रग्ज पुरविण्यासाठी तोंडात ड्रग्ज घेऊन जायची. तिथे गेल्यानंतर किस करण्याचे नाटक करत ती त्याला ड्रग्ज देत होती. मात्र, यावेळी तिने तोंडात आणलेले ड्रग्ज जास्त होते. जेव्हा प्रियकराच्या तोंडात हे ड्रग्ज गेले तेव्हा ते थेट त्याच्या घशात गेले आणि अतिसेवनाने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर अमेरिकेतील कारगृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आता बाहेरून येणारा कोणीही कैद्याला भेटत असताना त्याला इजा पोहोचवू नये यासाठी कारागृहात यासाठी कडक नियम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ; प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं?

Places To Avoid Visit In Summer: एप्रिल- मे महिन्यात या 3 ठिकाणी बिलकूल भेट देऊ नका, गर्मीमुळे व्हाल हैराण

Borivali Tourism : चला वीकेंडला फिरायला! उन्हाळ्यात थंडावा देणारी 'बोरीवली'तील ५ सुंदर पिकनिक स्पॉट

Crime: सावत्र बाप करायचा लैंगिक अत्याचार; वैतागून घर सोडून पळालेल्या मुलीवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

April 2026 Festival Calendar: एप्रिल महिन्यात कोणकोणते महत्वाचे सण आहेत? A टू Z माहिती एकाच क्लिकवर

SCROLL FOR NEXT