Uttar Pradesh News Saam TV
देश विदेश

Viral Video : Reelच्या नादात १६ वर्षीय मुलाचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू, मित्राच्या मोबाईमध्ये घटना कैद

Railway Accident : ट्रेनच्या धडकेत हा मुलागा दूरवर फेकला जातो. संपूर्ण घटना मित्राच्या मोबाईलमध्ये कैद झाली आहे.

प्रविण वाकचौरे

Uttar Pradesh News :

उत्तर प्रदेशचत्या बाराबंकीमध्ये REEL बनवण्याच्या नादात एका 16 वर्षीय मुलाचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला आहे. गुरुवार 28 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. शनिवारी घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लाल शर्ट घातलेला एक मुलगा डोक्याला रुमाल बांधून रेल्वे ट्रॅकवर जात आहे. तेव्हा त्याच्या मागून एक ट्रेन येते. त्या ट्रेनच्या धडकेत हा मुलागा दूरवर फेकला जातो. संपूर्ण घटना मित्राच्या मोबाईलमध्ये कैद झाली आहे. (Viral Video)

विद्यार्थ्याला ट्रेनने धडक दिल्याची माहिती मिळताच जीआरपी आणि आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. कुटुंबीय आल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. (Latest News Update)

जहांगीराबाद शहरातील टेरा दौलतपूर गावात राहणारा १६ वर्षीय फरमान आपल्या ३ मित्रांसोबत फिरायला गेला होता. दरम्यान तो दामोदरपूर गावातील रेल्वे क्रॉसिंगजवळ रील बनवण्यासाठी गेला होता. त्याचा एक मित्र अप-लाइनवर उभा राहिला आणि व्हिडिओ शूट करत होता.

फरमानने त्याला स्लो मोशनमध्ये रील बनवण्यास सांगितले. दरम्यान दरभंगा एक्स्प्रेस डाऊन मार्गावर आली. रेल्वेच्या इंजिनला धडक बसल्याने फरमान रुळाच्या बाजूला पडला. मोबाईल सुरु असल्याने सगळी घटना त्यात रेकॉर्ड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT