Vaccine Saam TV
देश विदेश

जबरदस्त! १८ वर्षांवरील सर्वांनाच आता बुस्टर डोस; कधी पासून ते जाणून घ्या...

10 एप्रिल पासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

वृत्तसंस्था

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना केंद्र सरकारने (Central Government) महत्वाची घोषणा केली आहे. आता 18 वर्ष वयोगटापुढील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस (Vaccine) मिळणार आहे. येत्या 10 एप्रिलपासून हे डोस उपलब्ध होणार आहेत, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 18 वर्षांवरील ज्यांनी दुसरा डोस घेतला असून 9 महिने पूर्ण झाले आहेत त्यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. सर्व खाजगी लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोस उपलब्ध असणार आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

देशात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने कमी होत आहे आणि त्याच दरम्यान, त्याचा धोका पूर्णपणे दूर करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती ही लस घेऊ शकते. मात्र, हा बूस्टर डोस घेणे बंधनकारक नाही. ते पूर्णपणे ऐच्छिक आहे. जर एखाद्याला बूस्टर डोस घेणे आवश्यक वाटले तर तो ते करून घेऊ शकतो असे देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

मंत्रालयाने सांगितले की, सध्या पहिला आणि दुसरा डोस सरकारी केंद्रांवर दिला जात आहे. याशिवाय या केंद्रांवर आरोग्य सेवा कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही बूस्टर डोस दिला जात आहे. याशिवाय, जे इतर लोक बूस्टर डोस घेण्यास इच्छुक आहेत, ते देखील खाजगी लसीकरण केंद्रांना भेट देऊन लसीकरण करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT