Kerala Breaking News , RSS Office, Kerala News Update, Kerala News, RSS Kerala, RSS News SAAM TV
देश विदेश

Kerala : केरळात आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला; पाेलीस घटनास्थळी दाखल

आज सकाळच्या प्रहरी घडली घटना.

साम न्यूज नेटवर्क

केरळ : केरळ (kerala) येथील कन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर (RSS Office) आज (मंगळवार) बॉम्ब टाकण्यात आला. त्यामुळे या परिसरात माेठी खळबळ उडाली. पय्यानूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात इमारतीच्या (building) खिडक्यांच्या काचा फुटल्या. आम्ही या घटनेचा तपास सुरू केल्याचे ही पाेलीसांनी सांगितलं. या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेले नाही असे देखील पाेलीसांनी (police) नमूद केले. हा हल्ला कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला ? याची माहिती तूर्तास तरी समोर आलेली नाही. (Kerala News Update)

दुर्दैवी घटना

या घटनेवर भाष्य करताना भाजपचे टॉम वडाक्कन यांनी सामाजिक संघटनांवर बॉम्ब फेकण्याइतपत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे, हे धक्कादायक आणि दुर्दैवी आहे असे म्हटलं आहे. समाज माध्यमातून टाॅम यांनी प्रतिक्रिया नाेंदवली आहे.

टॉम वडाक्कन यांनी पाेलीसांवर आक्षेप नाेंदविले आहेत. त्यांच्या म्हणण्यानूसार पोलिसांची मिलीभगत अत्यंत धोकादायक आहे. पोलीस ठाणे शंभर मीटर अंतरावर असूनही घटना घडली हे दुर्देवी आहे. विशेषत: कन्नूरसारख्या संवेदनशील जिल्ह्यात कार्यालयांचे संरक्षण करावे लागते. दरम्यान राज्यातील कोणत्याही राजकीय कार्यालयाचे नुकसान झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल असेही वडाक्कन यांनी नमूद केले. (RSS News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT