नादखुळा! चक्क शेतकऱ्याने शेतात लावले सनी लिओनीचे बोल्ड पोस्टर Twitter/@mcreationsbolly
देश विदेश

नादखुळा! चक्क शेतकऱ्याने शेतात लावले सनी लिओनीचे बोल्ड पोस्टर

सनी एका मजेदार कारणामुळे चर्चेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंध्र प्रदेश- भारतीयांनी सर्वाधिक वेळा गुगल Google सर्च केलेल्या विषयांमध्ये दरवर्षी सनी लिओनी Sunny leone हे नाव आघाडीवर असते. सनीला भारतात अभिनेत्री म्हणून ओळख मिळाल्यानंतर ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली. विशेष म्हणजे आता सनी एका मजेदार कारणामुळे चर्चेत आली आहे. हे म्हणजे कारण सनीचे एक पोस्टर आहे.

आंध्र प्रदेशमधील Andra Pradesh नल्लोर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क त्याच्या शेतात सनीचे दोन मोठे मोठे पोस्टर्स लावल्याची फोटो समोर आले आणि सगळीकडे या पोस्टर्सचे फोटो व्हायरल झाले. या पोस्टरवर तेलगू भाषेत एक ओळ देखील लिहिली आहे. या पोस्टरवर माझ्यासाठी रडू नका किंवा माझ्यावर जळू नका असे लिहण्यात आले आहे.

हे देखील पहा -

शेतकऱ्याने सनीचा हा असा पोस्टर आपल्या शेतात का लावला असा प्रश्न आता तुम्हला पडला असणार. तर यामागेही एक अनोखे कारण आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकणाऱ्या शेतमालाला लोकांची नजर लागू नये म्हणून लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि पिकांऐवजी या पोस्टरने सर्व्यांचे लक्ष केंद्रित व्हावे म्हणून हा पोस्टर शेतात लावण्यात आला आहे.

अक्कीनापल्ली चिनचू रेड्डी असे पोस्ट लावणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे..त्यांनी सनीच्या या पोस्टरचा वापर बुजगावण्यासारखा केला असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. दरम्यान आता सनी लवकरच ‘रंगीला’ आणि ‘शेरो’ या मल्याळम चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Edited BY - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT