Tarique Rahman Saam Tv
देश विदेश

Bangladesh Election 2026: बांगलादेशमध्ये BNP चा मोठा विजय, तारिक रहमान होणार पंतप्रधान; कोण आहेत?

Tarique Rahman: बांगलादेशमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बीएनपीचा मोठा विजय झाला. सर्वाधिक जागा मिळवत या पक्षाने बहुमताचा आकडा पार केला. त्यामुळे आता या पक्षाचे प्रमुख तारिक रहमान पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.

Priya More

Summary -

  • बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने ३०० पैकी २१२ जागां मिळवल्या

  • बागलादेशमध्ये बीएनपी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला

  • तारिक रहमान पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता

  • २०२४ नंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक

बांगलादेशमध्ये नुकताच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत बांगलादेशने निर्णायक जनादेश दिला आहे. या निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या पक्षाने बहुमताचा दावा केला असून बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची सत्ता येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. तारिक रहमान हे बांगलादेशचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.

स्थानिक टीव्ही चॅनेल्सच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार आणि पक्षाच्या दाव्यानुसार, बीएनपीने बहुमत मिळवले आहे आणि या पक्षाने सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. बांगलादेशसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती कारण २०२४ च्या जनरल-झेड-नेतृत्वाखालील क्रांतीनंतर पंतप्रधान शेख हसीना यांचे दीर्घकाळ चालणारे सरकार उलथवून टाकल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला या निवडणुकीत ३०० पैकी २१२ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने जमात-ए-इस्लामिक या पक्षाचा दारूण पराभव केला. जमात-ए-इस्लामीकला फक्त ७२ जागांवर विजय मिळवता आला. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा मोठा विजय झाल्यामुळे आता तारिक रेहमान हे बांगलादेशचे पंतप्रधान होणार असल्याचे सांगितले जात आहे. तारिक रेहमान हे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे प्रमुख आहेत. लंडनमध्ये राहणारे तारिक रेहमान हे १७ वर्षांनंतर देशात परतले. त्यानंतर तारिक रहमान यांनी ही निवडणूक लढवत ढाका-१७ आणि बोगुरा-६ या दोन्ही जागा जिंकल्या.

बीएनपीचे प्रमुख तारिक रहमान डिसेंबरमध्ये बांगलादेशला परतले. निवडणुकीच्या निकालांवरून आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे की, तारिक रहमान हे बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान असतील. शफीकुर रहमान यांचा पक्ष जमात-ए-इस्लामी देखील निवडणुकीत एक प्रमुख दावेदार होता. पण या निवडणूक निकालांनी त्यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये एकूण ५० राजकीय पक्ष, १,७५५ उमेदवार आणि २७३ अपक्ष निवडणूक रिंगणात होते. बीएनपी मीडिया सेलने सोशल मीडियावर एक पोस्ट करत विजयाचा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सांगलीत तरुणाची हत्या, मृतदेह विहिरीत फेकला

Conversions Bill: महाराष्ट्रात लागू होणार धर्मांतरण कायदा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी

Viral Video: आकाशात ३ हजार फुटावर घडली दुर्घटना, 2 पॅराग्लायडर एकमेकांवर आदळले; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा, VIDEO

गजनी, पैलवान ते हिस्ट्री सीटर गुन्हेगार; निलेश घायवळच्या दिली होती कानफटात, गुंड सागर मोहोळकरची कुंडली आली समोर

एमआयएमच्या १० नगरसेवकांचं पद जाणार? काय आहे कारण? VIDEO

SCROLL FOR NEXT