दिल्लीतील रोहिणी न्यायालयाच्या रुम क्रमांक 102 मध्ये बाँबस्फोट ! Twitter/ @ANI
देश विदेश

दिल्लीतील रोहिणी न्यायालयाच्या रुम क्रमांक 102 मध्ये बाँबस्फोट !

दिल्लीतील रोहिणी कोर्टातून (Rohini Court) एक मोठी बातमी समोर येत आहे. कोर्ट रूम नंबर 102 मध्ये स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.

वृत्तसंस्था

संतोष शाळीग्राम (नवी दिल्ली)

नवी दिल्ली: दिल्लीतील रोहिणी कोर्टातून (Rohini Court) एक मोठी बातमी समोर येत आहे. कोर्ट रूम नंबर 102 मध्ये स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. लॅपटॉपमुळे हा स्फोट झाला असावा, असे काही लोकांचे म्हणणे आहे. तपासासाठी केबिनभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, त्यांना सकाळी 10:40 वाजता स्फोटाचा कॉल आला. त्यानंतर 6 वाहने घटनास्थळी पाठवण्यात आली.

दोन जण जखमी झाल्याची माहिती. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रोहिणी जिल्ह्याचे डीसीपी आणि एसीपी आरती शर्मा रोहिणी कोर्टात पोहोचले आहेत. या स्फोटामुळे जमिनीत मोठा खड्डा पडला आहे. पण हा स्फोट कशामुळे झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.

तर, स्फोटाच्या प्रकाराचा तपास सुरू आहे. सध्या न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्याची सुनावणी थांबवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळाला घेरून आपली सुरक्षा वाढवली आहे. दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

या घटनेनंतर रोहिणी न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रत्येकजण जिथे हजर होता तिथून सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. या स्फोटात दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT