BJP's resounding success in Goa, thanks to Modi and Fadnavis from Pramod Sawant Saam Tv
देश विदेश

Goa Election Results: गोव्यात भाजपला दणदणीत यश, प्रमोद सावंताकडून मोदी, फडणवीसांचे आभार

Goa Election Results: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताला आम्ही स्वयोपूर्ण गोवा मध्ये कन्व्हर्ट करत ही योजना लोकांपर्यंत पोहोचवली.

साम टिव्ही

गोवा: गोव्यात दणदणीत विजय (Goa Assembly Elections) मिळवल्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. प्रमोद सावंतानी (Pramod Sawant) गोव्याच्या जनतेचे आभार मानले. गोव्याची जनता आम्हाला निवडून आणेल हा विश्वास आम्हाला होता असंही ते म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. (BJP's resounding success in Goa, thanks to Modi and Fadnavis from Pramod Sawant)

हे देखील पहा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताला आम्ही स्वयोपूर्ण गोवा मध्ये कन्व्हर्ट करत ही योजना लोकांपर्यंत पोहोचवली. याचा फायदा आम्हाला झाला. जनतेने पुन्हा एकदा 20 जणांना निवडून आणले आहे. 2012 मध्ये युतीमध्ये आम्हाला 21 जागा मिळाल्या होत्या. यावेळी युतीशिवाय आम्हाला स्वबळावर 20 जागा जिंकता आल्या आहेत. इतकंच नाही तर मतांची टक्केवारीही वाढली आहे. गेल्या निवडणुकीत व्होटिंग शेअर परसेन्टेज 32 होता, यावेळी तो 34.3 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तू फ्रिजमध्ये सापडशील...' बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून डेंटिस्ट तरुणीची आत्महत्या; ६ पानांच्या सुसाईड नोटने मुंबई हादरली

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३००० मिळणार? फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

LPG गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबणार; फक्त एक कॉल करा आणि पोलिसांना कळवा, आयुक्तांचे कडक निर्देश

Success Story: १ मार्कमुळे पहिली संधी हुकली, पण दुसऱ्यांदा IAS झालाच; अर्पित गुप्ता यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT