BJP youth leader Prashant Tripathi who lost his life in a tragic road accident in Uttar Pradesh. Saam Tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; आमदार, खासदारांकडून तातडीने सर्व दौरे रद्द

BJP Youth Leader Prashant Tripathi Death News: उत्तरप्रदेशातील भाजपचे युवा नेते प्रशांत त्रिपाठी यांचा हरदोई येथे भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून अनेक आमदारांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Omkar Sonawane

उत्तरप्रदेश येथील भाजपचे युवा नेते प्रशांत त्रिपाठी यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. ही बातमी समजताच तिरवाचे आमदार कैलाश राजपूत, छिब्रमऊच्या आमदार अर्चना पांडे आणि वीर सिंह भदौरिया त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. समाजवादी पक्षाचे माजी आमदार कल्याण सिंह दोहरे, रजनीकांत आणि नेम सिंह यादव हे देखील निवासस्थानी आले. या सर्वांनी प्रशांतच्या वडिलांचे सांत्वन केले.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात हरदोई जिल्ह्यातील मटिया मऊ वळणावर काल रात्री घडला. प्रशांत त्रिपाठी त्यांच्या 'थार' कारने सीतापूरमधील सिधौली येथे एका कौटुंबिक समारंभावरून घरी परतत होते. यावेळी त्यांची कार अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली.

या भीषण अपघातात कारमधील पाचही जण जखमी झाले होते. प्रशांत त्रिपाठी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कानपूरच्या रीजेंसी रुग्णालयात नेण्यात येत होते, मात्र वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

प्रशांत त्रिपाठी हे माजी जिल्हा पंचायत सदस्य गोपाल त्रिपाठी यांचे पुत्र होते. त्यांचे पार्थिव निवासस्थानी पोहोचताच मोठ्या संख्येने समर्थक, भाजप नेते आणि इतर पक्षांचे प्रतिनिधी श्रद्धांजली वाहण्यासाठी जमा झाले. प्रशांत यांच्या निधनाने त्यांची आई अरुणा त्रिपाठी आणि पत्नी मानसी यांचा टाहो हृदयद्रावक होता. प्रशांत यांच्या पश्चात त्यांची पाच वर्षांची मुलगी कनिका असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT