west bengal news  Saam tv
देश विदेश

भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

west bengal shocking : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू

४५ वर्षीय कार्यकर्त्याच्या मृत्यूने खळबळ

दिवंगत हाबूलाल भाजपचा सक्रिय कार्यकर्ता

पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुफस्सिल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कनाली गावात शुक्रवारी सकाळी भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला. हाबूलाल गोप असे ४५ वर्षीय कार्यकर्त्याचे नाव आहे. हाबूलाल हा आडषा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बेलडी गावाचा रहिवासी होता. हाबूलाल हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता होता.

नातेवाईकांच्या माहितीनुसार, हाबूलाल गुरुवार एका लग्नानिमित्त घरातून निघाला. घरातून लग्नाला निघालेला हाबूलाल घरी परतलाच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हाबूलालचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हाबूलालचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. हाबूलालची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी आरोप केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाबूलाल हे शुक्रवारी सायंकाळी पावसामुळे कनाली गावाच्या दुकानावर थांबले. त्यांच्यासोबत त्यांचा भाचा होता. ते दुकानावरून अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे भाच्याने मामा हाबूललालला शोधण्यास सुरुवात केली. काही तास शोधल्यानंतरही भाचा घरी गेला. त्यानंतर सकाळी हाबूलालचा मृतदेह गावात एका रस्त्याच्या किनाऱ्यावर सापडला.

कुटुंबातील हाबूलाल गोप याच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. त्यांच्या चेहरा, छाती, पोटावर निळ्या रंगाच्या खुणा आहेत. हाबूलाल राजकारणात सक्रिय असल्याने लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बेदम मारहाण करून हत्या केल्याचाही आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलीस सध्या पोस्टमार्टम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रकांत रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'भाजपमुक्त राम'च्या नाऱ्यावर शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!

Foot Care : ५ चुकांमुळे पायांना होतं इन्फेक्शन, संसर्ग कसा रोखायचा? एकदा सोप्या टिप्स पाहा

Operation Tiger: शिंदेंच्या शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चे एक्स्क्लुझिव्ह फोटो समोर; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

केंद्र सरकारनं आणली EDLI योजना, थेट ७ लाखांचा मोफत विमा अन्...; पाहा नेमकी योजना काय?

Veen Doghantali Hi Tutena : स्वानंदीचा अपमान करणाऱ्या सुष्मिताला समरनं खडसावलं, मालिकेत नवा ट्विस्ट | VIDEO

SCROLL FOR NEXT