Amit Shah Gujarat  SaamTV
देश विदेश

काँग्रेसला 'मोदी फोबिया' झालाय; अमित शहांचा हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी हैदराबादमधील कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसवर निशाणा साधला.

साम टिव्ही ब्युरो

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा (Amit Shah) यांनी हैदराबादमधील कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसला 'मोदी फोबिया' झाला आहे. ते देशहिताच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करत आहेत, असं शहा म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या (bjp national committee) बैठकीत अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. काँग्रेसवरही (congress) त्यांनी हल्लाबोल केला. देशातील प्रमुख विरोधी पक्षात लोकशाही स्थापन करण्यासाठी त्यांचेच सदस्य आपापसात लढत आहेत. मात्र, 'गांधी कुटुंबा'च्या भीतीने अध्यक्षपदासाठी निवडणूक घेत नाहीत, असे शहा म्हणाले.

काँग्रेसला 'मोदी फोबिया' झाला आहे. देशहिताच्या सर्व निर्णयांना ते विरोध करत आहेत, असेही शहा म्हणाले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सादर केलेल्या प्रस्तावावर बोलताना अमित शहा म्हणाले की, पुढील ३० ते ४० वर्षे हे भाजपचे असतील आणि भारत विश्वगुरू होईल. शहा यांचे बैठकीतील संबोधनातील ठळक मुद्दे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सरमा यांच्या माहितीनुसार, जातीयवाद, वंशवाद आणि तुष्टीकरण ही राजकारणाला लागलेला मोठा शाप आहे असे शहा म्हणाले. विरोधक हे अस्वस्थ झालेले आहेत. काँग्रेसमध्ये लोकशाही आणण्यासाठी त्यांचेच सदस्य आपापसात लढत आहेत आणि गांधी कुटुंबाच्या भीतीने ते अध्यक्षपदाची निवडणूकही घेत नाहीत, असेही शहा म्हणाले.

काँग्रेस हताश आणि निराश झाला आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेला ते विरोध करत आहेत. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक, काश्मीरमधून कलम ३७० हटवणे किंवा कोरोना प्रतिबंधक लसीकरण या सर्वांना काँग्रेसकडून विरोध करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसला मोदी फोबिया झाला आहे. ते देशहिताच्या सर्व निर्णयांना विरोध करत आहेत. काँग्रेस पूर्णपणे हताश आणि निराश झाला आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावरही तोफ डागली. अंमलबजावणी संचालनालयाकडून राहुल गांधींची चौकशी सुरू असताना, काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला विरोध केला आणि आंदोलन करून ड्रामा केला, असे ते म्हणाले. तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये येथील कुटुंबांच्या शासनांचा भाजप पराभव करेल, असा दावाही शहा यांनी यावेळी केला.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT