Pradnya singh thakur statement Saam Tv
देश विदेश

Pragya Singh Thakur : हिंदूंनी घरात शस्त्र ठेवावीत, नाहीतर.., प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Pragya Singh Thakur : नेहमी कोणत्या-कोणत्या कारणांनी चर्चेत राहणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. प्रज्ञा ठाकूर यांनी हिंदूंना घरात शस्त्रे ठेवण्याचा सल्ला दिला आहे. लव्ह जिहादबाबत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. यामुळे पुन्हा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाल्या प्रज्ञा ठाकूर?

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत प्रज्ञा ठाकूर लव्ह जिहादबाबत हिंदूंना मार्गदर्शन करताना दिसून येत आहे. लोकांनी भाजी कापण्यासाठी चाकू धारदार ठेवावा, जेणेकरून संधी मिळेल तेव्हा शत्रूंचे मुंडकेही सहज कापता येतील, असं प्रज्ञा ठाकूर व्हिडीओत म्हणता आहेत, हा व्हिडीओ कर्नाटकातील एका कार्यक्रमातील आहे.

घरात शस्त्रे ठेवण्याचा दिला सल्ला

“हिंदूंना त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणार्‍यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. प्रत्येक हिंदुंनी आपल्या घरात शस्त्रे ठेवली पाहिजे, जर मिळत नसतील तर, घरात किमान भाजीपाला कापण्याचा धारधार चाकू तरी ठेवावा, कधी कोणती परिस्थिती येईल हे सांगता येत नाही, प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. आमच्या घरात घुसून आमच्यावर कोणी हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे', असं विधान प्रज्ञासिंह ठाकूर करताना दिसून येत आहे.

दरम्यान, प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेलं हे भडकाऊ विधान सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त करत टीका केली आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्यात फूट पाडण्याचं काम करू नका, असं नेटकरी म्हणताना दिसून येत आहेत. तर काहींनी त्यांच्या या विधानावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यापूर्वी देखील वादग्रस्त विधानं केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT