BJP MP Narhari Amin  Saam TV
देश विदेश

BJP MP Narhari Amin : संसदेत फोटो सेशनदरम्यान भाजप खासदार बेशुद्ध, अमित शहा धावले मदतीला

Viral Video : खासदारांच्या ग्रुप फोटो सेशनदरम्यान भाजप खासदार नरहरी अमीन हे अचानक बेशुद्ध पडले.

साम टिव्ही ब्युरो

New Parliament :

जुन्या ऐतिहासिक संसद भवनात आज शेवटचा दिवस आहे. ७५ वर्षांची संसदीय परंपरा जपलेल्या संसदेतून बाहेर पडण्यापूर्वी तिथे फोटो सेशन पार पडलं. या फोटो सेशनमध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदारही उपस्थित होते. खासदारांच्या ग्रुप फोटो सेशनदरम्यान भाजप खासदार नरहरी अमीन हे अचानक बेशुद्ध पडले.

गोंधळानंतर फोटो सेशन मधेच थांबवून सगळे त्यांच्या दिशेने धावले. पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी देखील फोटो सेशनमध्ये भाग घेतला. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत महिती दिली आहे.  (Latest Marathi News)

नरहरी अमीन हे गुजरातमधील भाजपचे खासदार आहेत. फोटो सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी ते संसद भवनात उपस्थित होते, मात्र अचानक ते बेशुद्ध झाले. नंतर काही वेळातच त्यांना बरं वाटलं.

फोटो सेशननंतर दोन्ही सभागृहातील खासदार सेंट्रल हॉलमध्ये जमले होते. त्यानंतर सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संसदेच्या नवीन इमारतीत दाखल होतील. गणेश चतुर्थीच्या विशेष मुहूर्तावर आज, १९ सप्टेंबरपासून नवीन संसद भवनात कामकाज सुरू होणार आहे. काल जुन्या संसदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी खूपच भावूक झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

Crime: तरुणाने जन्मदात्या आईचा घेतला जीव, चिमुकल्यासमोरच पाईपने मारहाण करत संपवलं; बीडमध्ये खळबळ

Shubman Gill: शुभमन गिलची ट्रिपल सेंच्युरी हुकली; मात्र विराट कोहलीचा महारेकॉर्ड मोडला, गावस्करांनाही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT