भाजप आमदाराची फॉर्च्युनर तरुणाने पेटवली, घटनेचा VIDEO व्हायरल Saam Tv
देश विदेश

भाजप आमदाराची फॉर्च्युनर तरुणाने पेटवली, घटनेचा VIDEO व्हायरल

भारतीय जनता पक्षाच्या आमदाराची फॉर्च्युनर गाडी एका तरुणाने पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : भारतीय जनता पक्षाच्या आमदाराची फॉर्च्युनर गाडी एका तरुणाने पेटवल्याची (MLA) धक्कादायक घटना समोर आली आहे. एमएलए हॉस्टेलमध्ये उभी असलेली ही गाडी रात्रीच्या सुमारास पेटवण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद (CCTV) झाली आहे. आमदारांची गाडी पेटवल्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरले आणि मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली.

ही घटना हरियाणामध्ये (Haryana) घडली आहे. हरियाणातील पानीपत (Panipat) येथील भाजपचे आमदार प्रमोद विज यांची फॉर्च्युनर गाडी (Car) रात्रीच्या सुमारास पेटवण्यात आली होती. चंडीगढ (Chandigarh) येथील एमएलए हॉस्टेलमध्ये ही गाडी उभी होती आणि एका तरुणाने रात्रीच्या सुमारास गाडी पेटवली आहे. हे एक षडयंत्र असल्याचे आमदार (MLA) प्रमोद विज यांनी यावेळी सांगितले आहे. त्यांनी सांगितले आहे की, त्या ठिकाणी इतर गाड्या पार्क करण्यात आले होते.

हे देखील पहा-

मग माझ्याच गाडीला आग का लावण्यात आली? मंगळवारी हरियाणा मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार होता. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार समारोहामध्ये सहभागी होण्याकरिता आमदार प्रमोद विज हे चंडीगढ येथे आले होते. रात्रीच्या सुमारास त्यांच्या गाडीला आग लागली असल्याची माहिती समोर आली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेस आमदार प्रमोद विज हे पंचकूला येथे थांबले होते. तर त्यांचा पीए आणि इतर स्टाफ हे चंडीगढ येथील एमएलए हॉस्टेलमध्ये थांबले होते. ही घटना एमएलए हॉस्टेलमध्ये घडली आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस (Police), अग्निशमन दलाचे जवान दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. नंतर घटनास्थळावर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक तरुण आमदार प्रमोद विज यांच्या गाडीजवळ येत होता आणि. त्यानंतर तो गाडीची काच फोडतो आणि मग गाडीला आग लावून पाल काढला आहे. पोलिसांनी आज हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याद्वारे पोलीस तपास सुरू केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: शिक्षिकेकडे शाळा ट्रस्टीच्या मुलानं केली शरीरसुखाची मागणी; आधी पाठवला अश्लील व्हिडिओ नंतर...

Maharashtra Live News Update: अमरावती,नागपूर महामार्गावरील अमरावती जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप बंद

आता गावाकडची खरात फाइल्स उघडली! गावकऱ्यांनी सांगितले भोंदूबाबाचे एकेक हादरवणारे कारनामे

Pune Historic Places : धुक्यात हरवलेला किल्ला; घनदाट जंगलातून करा रोमांचक ट्रेक, पुण्यात लपलंय 'हे' ठिकाण

Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात आमदाराची बायको, ती कोण? चर्चेनं महाराष्ट्रात खळबळ

SCROLL FOR NEXT