BJP MLA B Suresh Gowda daughter Aishwarya police case saam tv
देश विदेश

Shocking : भाजप आमदाराच्या मुलीनं महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली मारली, वडिलांना मागावी लागली माफी

BJP MLA Daughter Allegedly Slaps Woman Police Officer : भाजप आमदाराच्या मुलीनं एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून रोखल्यानं आमदाराच्या मुलीनं हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

Nandkumar Joshi

BJP MLA Daughter Slap PSI : कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथील भाजपच्या आमदाराच्या मुलीनं श्रीरंगपट्टणम तालुक्यातील एका गावात मंदिरात तैनात महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या (PSI) कानशि‍लात लगावली. ही धक्कादायक घटना १२ ऑगस्टची असल्याचे सांगितले जात आहे. तुमकूर ग्रामीण मतदारसंघातील भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या हिनं महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली मारल्याचा आरोप आहे.

हरियाली अमावस्येच्या निमित्तानं बुधवारी, १२ ऑगस्टला उक्कडास्थित प्रसिद्ध श्री लक्ष्मी नरसिम्हास्वामी मंदिरात आरतीसाठी हजारो भाविकांची गर्दी झाली होती. भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या ही देखील मंदिरात दर्शनासाठी गेली होती. ऐश्वर्यानं व्हीआयपी रांगेतून प्रवेश मिळवला आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे.

क्याथनहल्ली पोलीस ठाण्याच्या पीएसआय सविता या मंदिरात कर्तव्य बजावत होत्या. त्यांनी आमदाराच्या मुलीला गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं. मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ शकत नाही, असं त्यांनी ऐश्वर्याला सांगितलं. त्याचवेळी तिथे कर्तव्यावर असलेल्या सर्कल इन्स्पेक्टर लक्ष्मी या गाभाऱ्यात गेल्या. त्यावर तुम्ही त्यांना कसं आत जाऊ दिलं, असा सवाल ऐश्वर्याने केला. त्यावर त्या आमच्या सर्कल इन्स्पेक्टर आहेत, त्या ड्युटीवर आहेत, असे उत्तर पीएसआय सविता यांनी दिलं.

आमदाराची मुलगी ऐश्वर्या या गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न करू लागल्या. मला गाभाऱ्यात जाऊ द्या, मला जायचंच आहे, असा हट्ट ऐश्वर्या करायला लागली. त्यांच्यात शाब्दिक वादही झाला. ऐश्वर्याने कर्तव्यावर असलेल्या पीएसआय सविता यांच्या कानशिलात लगावली. या घटनेप्रकरणी ऐश्वर्या यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी ऐश्वर्याविरोधात क्यथानहल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले. माझी मुलगी व्हीआयपी रांगेत उभी होती. त्या वेळी तिने गाभाऱ्यात दर्शनासाठी जाऊ देण्याची विनंती केली होती. महिला पोलीस अधिकाऱ्याने तिला आत जाऊ दिलं नाही. त्याच वेळी अन्य एक सर्कल इन्स्पेक्टरला गाभाऱ्यात जाण्याची परवानगी दिली. त्यावर माझ्या मुलीने त्यांना विनंती केली. माझ्यासोबत दोन लहान मुले आहेत आणि मी सुद्धा विनंती करत आहे, मी एका आमदाराची मुलगी आहे. शक्य असल्यास, कृपया मला मंदिरात आत जाऊ देण्याची परवानगी द्यावी, असे ती म्हणाली. मंदिरात प्रत्येक जण शांततेसाठी जातो, कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालण्यासाठी नाही. त्यामुळे, जी काही घटना घडली आहे, त्याबाबत माझ्या मुलीने काही चूक केली असेल किंवा मंदिराच्या नियमांचे उल्लंघन केले असेल, तर माझ्या मुलीने जे काही केले त्याबद्दल मी क्षमा मागतो, असे आमदार गौडा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; अस्थमाच्या झटक्याने वयाच्या ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: आदिवासी विद्यार्थ्यांचं भंडारा प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन

स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही विकास कागदावरच! मुंबईच्या शेजारील शहरात कमरेइतक्या पाण्यातून अंत्ययात्रा

Manifestation Tips : तुम्हाला मॅनिफेस्टेशनचे 'हे' ६ फायदे ठाऊक आहेत? स्वप्ने होतील झटक्यात पूर्ण

डायबिटीजचे रूग्ण भेंडीची भाजी खाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT