राजनादगांव : भाजपचे bjp वरिष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंह भाटिया Rajinderpal Singh Bhatia यांनी गळफास घेऊन, आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाटिया यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, राजनादगांव जिल्ह्यात खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंह भाटिया ३ वेळा आमदार म्हणून, निवडून आले आहेत.
हे देखील पहा-
रमन सरकारच्या पहिल्या टर्म मध्येच रजिंदरपाल सिंह भाटिया यांना मंत्रिपद देण्यात आले होते. यानंतर मंत्रिपदावरून त्यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सीएसआईडीसीचे चेअरमनपद डेन्ह्यात आले होते. 2003 मध्ये रजिंदरपाल सिंह भाटिया यांना भाजपने उमेदवारी देण्यात आली होती. त्याचवेळेस त्यांना मंत्रिपद देखील त्यांना मिळाले होते. 2008 च्या निवडणुकीत मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती.
2013 मध्ये देखील भाटिया यांना भाजपने तिकीट दिले नव्हते. यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून, निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, पण त्यांनी दुसऱ्या स्थान पटकावले होते. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी राजनादगांव येथील छुरिया भागात आपल्या भावासोबत राहत होते. रविवारी संध्याकाळी ते घरी एकटे होते.
कुटु्ंबातील सदस्य जेव्हा घरी आले, तेव्हा त्यांनी खोलीत गळफास घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रजिंदरपाल भाटिया मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. आपल्या प्रकृतीबद्दल ते चिंतातूर होते. भाटिया यांच्या आत्महत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. पोलिसांनी कुटुंबीयांशी चौकशी केली, असून अधिक तपास करत आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.