BJP President Wire
देश विदेश

BJP President: भाजप भाकरी फिरवणार! राष्ट्रीय अध्यक्षांसह अनेक राज्यांतील प्रदेशाध्यक्षही बदलणार

New BJP President : फेब्रुवारीच्या अखेरीस भाजपमध्ये मोठी उलटफेर होणार आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार आहेत.

Bharat Jadhav

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भाजपमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत. पक्षाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या मध्यापर्यंत निम्म्या राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तसेच इतर राज्यातील प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळही संपणार आहे, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांसह राज्यातील प्रदेशाध्यक्ष देखील बदलले जाणार आहेत.

पुढील महिन्यात नवीन अध्यक्ष बनवले जाणार आहेत. जेपी नड्डा यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी २०२० पासून आहे. यासह त्यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी आहे. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, भाजपचे नवे अध्यक्ष फेब्रुवारीअखेरीस या पदाची सूत्रे स्वीकारू शकतात. नवा अध्यक्ष हा सरकारचा किंवा संघटनेचाही असू शकतो, असे ते म्हणाले. दरम्यान याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाहीये.

भाजप अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचाच असतो. दरम्यान २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी जेपी नड्डा यांच्या कार्यकाळ वाढवण्यात आला होता. दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचं कमबॅकही झालं. भाजपमध्ये अध्यक्षपदाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. ऑगस्टमध्येही याबाबत चर्चा झाली होती पण त्यावेळी महाराष्ट्र, झारखंड आणि जम्मू-काश्मीर, हरियाणाच्या निवडणुका जवळ आल्या होत्या. त्यामुळे नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता.

पक्षाच्या संविधानानुसार, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होऊ शकते, ज्यांनी पक्षात कमीत कमी १५ वर्षापासून असेल. याआधी 2010 ते 2013 पर्यंत संघटनेची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे होती. राजनाथ सिंह 2005 ते 2009 आणि पुन्हा 2013 ते 2014 पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 2014 ते 2020 पर्यंत अमित शहा भाजपचे नेतृत्व करत होते.

महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षपदी कोण विराजमान होणार

चंद्रशेखर बावनकुळेंना मंत्रि‍पद देण्यात आल्याने आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष नक्की कोण होणार? याची चर्चा सुरू झालीय. रवींद्र चव्हाण आणि संजय कुटे या दोन नावांची सर्वाधिक चर्चा आहे. या दोघांनाही मंत्रि‍पदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे ही दोन नावे आघाडीवर आहेत. तर रवींद्र चव्हाण यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT