BJP MAJOR RESHUFFLE: DEEPAK MHASKEY APPOINTED IT CELL CHIEF, AMIT MALVIYA REMOVED saam tv
देश विदेश

भाजपमध्ये मोठा फेरबदल; अमित मालवीय यांना IT सेलच्या प्रमुख पदावरून हटवल; केमिस्ट्री प्रोफेसरकडे नेतृत्व

BJP IT Cell Chief Deepak Mhaskey Replaces Amit Malviya: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी जाहीर; आयटी सेलमध्ये मोठा फेरबदल. अमित मालवीय यांच्याऐवजी छत्तीसगडचे दीपक म्हस्के यांची आयटी सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

भाजपने आज राष्ट्रीय कार्यकारणीची यादी जाहीर केली असून यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्येच सोशल मीडिया विभागात देखील मोठेफेर बदल केले असून छत्तीसगडमधील दीपक म्हस्के यांची आयटी सेलच्या प्रमुखपदी म्हणून नियुक्ती केली आहे. तर आयटी सेल प्रामुखपदावरून अमित मालवीय यांना डच्चू दिला आहे. दीपक म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली चार वेगवेगळ्या राज्यांमधील प्रमुख नेत्यांना सोशल मीडिया सह-संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्यातून प्रीती गांधी, दिल्लीतून शिवानंद द्विवेदी, उत्तराखंडहून आलोक भट्ट आणि हरियाणामधून अरुण यादव यांची सोशल मिडिया समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल बलूनी हे पक्षाच्या माध्यम समन्वयक आणि मिडिया इन चार्जपदावर कायम आहेत. देशात सोशल मिडिया संघटना आणखी मजबूत आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने भाजपने बदल केले आहेत. अमित मालवीय 2015 पासून भाजपचे आयटी सेल प्रमुख होते. मात्र आता त्यांच्याऐवजी छत्तीसगडचे दीपक म्हस्के यांना ही जबाबारी देण्यात आली आहे.

कोण आहेत दीपक म्हस्के?

दीपक म्हस्के हे छत्तीसगडमधून येतात, ते आधी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. अलीकडेच त्यांची छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेज कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून काम केले असून, कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रातही त्यांचा अनुभव आहे. याशिवाय निवडणूक डेटा विश्लेषणाच्या क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. त्यांनी एका सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या संचालक मंडळावर काम केले असून, छत्तीसगड सरकारमध्ये वरिष्ठ पदावरही ते कार्यरत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT