Sonali Phogat Saam Tv
देश विदेश

Sonali Phogat Post Mortem Report | सोनाली फोगाट यांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट अखेर आला; मृत्यूआधी...

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: भाजप (BJP) नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवाल आला असून, सोनाली फोगाट यांच्या शरीरावर चार ते पाच जखमांचे घाव दिसून आले आहेत. विष देऊन हत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोनाली फोगाट यांचे व्हिसारा चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. नमुन्यांची तपासणी केल्यानंतर सोनाली यांना विष किंवा केमिकल देण्यात आला होता की नाही, याची माहिती अहवालातून मिळणार आहे.

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात पोलिसांनी सुखविंदर आणि सुधीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोवा पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हाही नोंदवला आहे.

सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला होता. त्याचवेळी या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, सोनाली यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. टोकदार वस्तूने केलेल्या त्या जखमा आहेत, असेही सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे गोवा पोलिसांनी या प्रकरणात सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सुखविंदर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलं आहे. वरिष्ठ पोलीस (Police)अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सोनाली फोगाट यांचा मृतदेह आज रात्रीच गोवा येथून दिल्लीला नेण्यात येईल. हिसारच्या ऋषी नगत स्थित स्मशानभूमीत सोनाली यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

Sugar-free laddoo: रक्षाबंधनासाठी साखर न वापरता बनवा हे हेल्दी लाडू; रेसिपी पाहून लगेच कराल ट्राय

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT