Bihar Political News Saam Tv
देश विदेश

Political News : खासदार होताच आमदारकीचा राजीनामा दिला, मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार?

Bihar Political News : बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड. भाजप नेते नितीन नबीन यांनी त्यांच्या विधान मंडळातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Alisha Khedekar

  • नितीश कुमार आणि नितीन नबीन यांचे राजीनामे

  • राज्यसभेवर निवडीनंतर घेतला निर्णय

  • बिहारच्या राजकारणात हालचाल

बिहारच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज बिहार विधान परिषदेचा राजीनामा दिला. त्यांच्याच पाठोपाठ आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी बिहार विधानसभेचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष प्रेम कुमार यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.

नितीन नबीन हे बिहारमधील बांकीपूर मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी ही जागा सलग पाच वेळा जिंकली होती. दोन आठवड्यांपूर्वी ते राज्यसभेवर निवडून आले होते. आता, राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी आपल्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये नबीन यांनी म्हटले आहे की, गेली २० वर्षे त्यांनी बांकीपूरचे नेतृत्व केले , लोकांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल ते नेहमीच कृतज्ञ राहतील, असे ते म्हणाले. तसेच, आपल्या नव्या भूमिकेतही बांकीपूर आणि बिहारच्या विकासाप्रती असलेली त्यांची कटिबद्धता कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे.

नितीश कुमार यांचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

जनता दल चे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही सोमवारी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नितीश कुमार हे १६ मार्च रोजी राज्यसभेवर निवडून आले होते. एक व्यक्ती एकाच वेळी दोन्ही सभागृहांचे सदस्य म्हणून काम करू शकत नाही, त्यामुळे राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर विधान परिषद सोडणे आवश्यक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT