BJP Leader Kills : Saam tv
देश विदेश

BJP Leader Killed : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Leader Kills : ओडिशामध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या झालीये. या हत्येच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

भाजप नेते पीताबाश पांडा यांची गोळ्या झाडून हत्या

अज्ञातांनी गोळ्या झाडून केली हत्या

हत्येच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपचे सदस्य आणि ज्येष्ठ वकील पीताबाश पांडा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ओडिशातील ब्रह्मनगर भागात अज्ञातांकडून पीताबाश पांडा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते आरटीआय कार्यकर्ता देखील होते. पांडा यांच्या घराजवळ दुचाकीवरून दोन अज्ञात आले. त्यांनीच त्यांच्यावर गोळीबार करून हत्या केली. पांडा यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अज्ञातांनी गोळीबार केल्यानंतर पीताबाश पांडा गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी पीताबाश पांडा यांना मृत घोषित केलं.

पीताबाश पांडा यांच्यावर गोळीबार का करण्यात आला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच मंत्री विभूती भूषण जेना आणि इतर भाजप नेत्यांनी एमकेसीजी रुग्णालयाला भेट दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

कटकमध्ये इंटरनेट सेवा बंद

दुर्गा पूजा मूर्ती विसर्जनावरून दोन गटात मोठा राडा झाला होता. ओडिशातील कटकमध्ये तणाव आणखी वाढला आहे. ओडिशा सरकारने सोमवारी कटकमध्ये इंटरनेट सेवा बंद केली होती. कटक शहरात दोन गटाच्या बाचाबाचीला हिंसक वळण लागल्यानंतर तोडफोडीची घटना घडली होती. त्यानंतर ओडिशाच्या गृह खात्याने इंटरनेट सेवा बंद केली होती.

पोलीस आयुक्त एस देव सिंह दत्ता यांनी म्हटलं की, रविवारी दोन गटात राडा झाला. सोशल मीडियावर अफवा पसरल्याने दोन गटात राडा झाल्याची शक्यता आहे. या घटनेत एक जण जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता या जखमीची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

Paithani Or Silk Saree Blouse Designs: पैठणी आणि सिल्क साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, एकदा नक्की ट्राय करा

Mosquito Safety: डासांना मारण्यासाठी 'ही' अगरबत्ती घेताय? त्याआधी ही माहिती वाचाच

ZP आणि खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येकाला मिळणार कॅशलेस वैद्यकीय सुविधा

SCROLL FOR NEXT