Manoj Tiwari Brother Passed Away :  साम टीव्ही
देश विदेश

भाजप खासदारावर कोसळला दुःखाचा डोंगर! सख्ख्या भावाचे निधन, राजकीय विश्वावर शोककळा

Manoj Tiwari elder brother Sadhu Sharan Tiwari passed away : भाजप खासदार आणि अभिनेते-गायक मनोज तिवारी यांचे ज्येष्ठ बंधू साधू शरण तिवारी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. भावाच्या निधनानंतर मनोज तिवारी यांनी भावूक पोस्ट शेअर केली.

Namdeo Kumbhar

Manoj Tiwari Brother Passed Away : भाजपचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते-गायक मनोज तिवारी यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मनोज तिवारी यांचे ज्येष्ठ बंधू 'साधू तिवारी' यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. भावाच्या अचानक जाण्याने मनोज तिवारी पूर्णपणे कोलमडून गेले असून त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. "माझे साधू भैया हे माझ्यासाठी ईश्वरासारखे होते, त्यांच्या निधनाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार हरपला आहे," अशा शब्दांत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे. या घटनेनंतर राजकीय आणि मनोरंजन जगतातून मनोज तिवारी आणि त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले जात आहे.

मनोज तिवारी यांचे थोरले भाऊ साधू शरण तिवारी यांचे शनिवारी दुपारी १:१५ वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना उपचारासाठी गंभीर अवस्थेत दिल्लीत आणण्यात आले होते. पण उपचारावेळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज तिवारी यांनी स्वतः एका अत्यंत भावनिक सोशल मीडिया पोस्टद्वारे ही दुःखद बातमी दिली.

चार भाऊ आणि एका बहिणीमध्ये साधू शरण तिवारी हे सर्वात मोठे होते. त्यांनी कुटुंबात पालकाची भूमिका बजावली. बीएचयू (BHU) मधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) सेवा बजावली. त्यांची आसाममधील नाझिरा-शिवसागर, कोलकाता आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये बदली झाली आणि अखेरीस ते महाव्यवस्थापक (GM) म्हणून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर, ते काशी (वाराणसी) या धार्मिक शहरात राहत होते.

फक्त भाऊच नाही, तर देवासारखा – मनोज तिवारी

आपल्या भावाच्या आठवणीत मनोज तिवारी यांनी लिहिले आहे की, साधू भैय्या त्यांच्यासाठी केवळ मोठ्या भावासारखेच नव्हते, तर देवासारखे होते. मनोज तिवारी यांच्या संगीत कारकिर्दीला मार्गदर्शन करण्यात, त्यांना गाण्याची प्रेरणा देण्यात आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत करण्यात साधू भैय्यांचे योगदान सर्वात मोठे होते. जेव्हा जेव्हा ते त्यांना भेटायचे तेव्हा साधू भैय्या त्यांना नेहमीच काही ना काही शिकवण आणि मार्गदर्शन करायचे.

अंतिम संस्कार काशी येथे होणार

भावाच्या शेवटच्या भेटीची आठवण सांगताना खासदारांनी लिहिले की, त्यांच्या भावाने शेवटच्या भेटीत त्यांना एक कविता ऐकवली होती, पण ती त्यांची शेवटची भेट ठरेल याचा कोणीही अंदाज लावू शकले नसते. साधू शरण तिवारी यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी काशीला नेण्यात आहे. आज, रविवारी दुपारी १२ वाजता प्रसिद्ध मणिकर्णिका घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जुलै - ऑगस्टचे ३,००० रुपये खात्यात कधी जमा होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी ई-केवाईसीवर दिली मोठी अपडेट

Sugar Substitutes: साखरेच्या जागी आजचं खाण्यास सुरुवात करा हे 5 पदार्थ; वजन आणि शुगर दोन्ही राहील कंट्रोलमध्ये

EPFO ची विशेष मोहीम! कर्मचाऱ्यांना मिळणार PF, EPS आणि EDLIचा लाभ, ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घ्या 'हे' काम

Kareena Kapoor : "पागल करते हो तुम लोग"; तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर करीना कपूर खाननं सोडलं मौन, VIDEO समोर

Low blood pressure: अचानक BP लो झालाय? डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरच्या घरी करा हे 5 सोपे उपाय

SCROLL FOR NEXT