Pramod Sawant Saam Tv
देश विदेश

Goa Election 2022: गोव्यात भाजपला २२ पेक्षा अधिक जागा, मुख्यमंत्री सावंतांचा दावा

भाजपने 10 वर्षात पायाभूत सुविधांचा विकास केला आणि पंतप्रधान मोदींच्या कार्याचा शंभर टक्के बहुमत मिळविण्यासाठी नक्कीच फायदा होईल

Shivani Tichkule

आज तीन विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गोव्यात ४० जागांसाठी (Goa), उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) ७० जागांसाठी, तर उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठी मतदान सुरु आहे. गोवा लहान राज्य आहे. पण, या निवडणुकीत अनेक पक्षांनी उडी घेतल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदी यांनी मला पहाटे फोन करून शुभेच्छा दिल्या. गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होईल, अशी आशा आहे. मला खात्री आहे की यावेळी आम्हाला 22 पेक्षा जास्त जागा मिळतील. यावेळीही लोक भाजपलाच मतदान करतील. भाजपने 10 वर्षात पायाभूत सुविधांचा विकास केला आणि पंतप्रधान मोदींच्या कार्याचा शंभर टक्के बहुमत मिळविण्यासाठी नक्कीच फायदा होईल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

गाेवा राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानास उत्साहात प्रारंभ झाला आहे. या राज्यात ४० जागांसाठी मतदान हाेत आहे. सकाळी सात वाजल्याच्या आधीपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर आपला हक्क बजावण्यासाठी रांगेत उभं राहण्यास प्रारंभ केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT