BJP candidates first List for Lok Sabha Election 2024 Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Election 2024: भाजपने दिल्लीत प्रवेश वर्मा यांच्यासह 4 उमेदवारांचं कापलं तिकीट, मनोज तिवारी यांना पुन्हा संधी

BJP candidates first List for Lok Sabha Election 2024: भाजपने दिल्लीतील पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी चार जागांवर जुन्या खासदारांची तिकिटे कापून नव्या उमेदवारांना देण्यात आली आहे.

Satish Kengar

BJP candidates first List for Lok Sabha Election 2024:

भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने एकूण १९५ उमेदवार उभे केले आहेत. पहिल्या यादीत भाजपने राजधानी दिल्लीतील ७ पैकी ५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. या पाच उमेदवारांपैकी चार उमेदवार हे नवे चेहरे आहेत. केवळ मनोज तिवारी यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

भाजपने दिल्लीतील पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी चार जागांवर जुन्या खासदारांची तिकिटे कापून नव्या उमेदवारांना देण्यात आली आहे. पश्चिम दिल्लीत प्रवेश वर्मा यांचे तिकीट कापून दिल्ली प्रदेश भाजपचे सरचिटणीस कमलजीत सेहरावत यांना देण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मीनाक्षी लेखी यांचाही पत्ता कट

तसेच चांदणी चौकातून डॉ.हर्षवर्धन यांचे तिकीट कापण्यात आले असून व्यापारी नेते प्रवीण खंडेलवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच नवी दिल्लीतून केंद्र सरकारच्या मंत्री मीनाक्षी लेखी यांचे तिकीट कापून माजी मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांना देण्यात आले. (Latest Marathi News)

दक्षिण दिल्लीतून रमेश बिधुरी यांचे तिकीट कापण्यात आले असून दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दर्शवला आहे. पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

दरम्यान, भाजपने पहिल्या यादीत एकूण १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत एकूण २८ महिला उमेदवारांची नावे आहेत. तर ५० वर्षांखालील ४७ उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपने पहिल्या यादीत ५७ ओबीसी, २७ एससी आणि १८ एसटी उमेदवारांना तिकीट दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PNG Connection : पाईप गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; १ सप्टेंबरपासून लागू होणार नवा नियम

Maharashtra News Live Update: आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजप-शिवसेनेवर निशाणा; महापालिकेच्या कारभारावरही सवाल

Tenant Verification : पुण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कारवाई; १७० गुन्हे दाखल

Mouth Odour : बोलताना तोंडाचा वास येतोय? या 6 घरगुती टिप्सने वास होईल गायब

Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची? कोर्टातील १० महत्त्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT