Bjp Organisational Reshuffle 24 New Appointments; Maharashtra Gets Key Responsibilities saam tv
देश विदेश

भाजपमध्ये पुन्हा फेरबदल! प्रभारींनंतर नवीन २४ सह-सरचिटणीस नियुक्त; महाराष्ट्राची धुरा कोणाकडे?

BJP Appointments 24 joint General secretary: भाजपने २४ नवीन संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या. शिवप्रकाश यांच्याकडे महाराष्ट्रासह पाच राज्यांची जबाबदारी देण्यात आली असून अजयराज जमवाल आणि सतीश धोंड यांनाही महाराष्ट्रात महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल

  • शिवप्रकाश यांच्याकडे महाराष्ट्राची संघटनात्मक जबाबदारी

  • अजयराज जमवाल भाजप महाराष्ट्र सरचिटणीस संघटन

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. यात भाजप आघाडीवर असून पक्षांतर्गत मोर्चेबांधणी केली जातेय. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल केले जात आहेत. राज्यांसाठी प्रभारी आणि सह-प्रभारींच्या नियुक्तीनंतर आता भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा एकदा (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी २४ नवीन संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय सह-सरचिटणीस (संघटन) शिवप्रकाश यांची आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांमधील पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. त्याचबरोबर राष्ट्रीय सह-सरचिटणीस (संघटन) सौदान सिंह यांच्याकडे बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालची जबाबदारी सोपवण्यात आलीय. तसेच उत्तर प्रदेशसाठी धर्मपाल यांची राष्ट्रीय सह-सरचिटणीस (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. भाजपकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकावर राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय मुख्यालय प्रभारी तरुण चुघ यांची स्वाक्षरी आहे.

या पत्रकानुसार, अजय जामवाल यांची महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. तर सतीश धोंड यांची महाराष्ट्राचे सह-सरचिटणीस आणि गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र या चार राज्यांमधील आदिवासी संपर्क मोहिमेचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

मधुकर यांना आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा राज्याचे सरचिटणीस बनवण्यात आले आहे. जर दशरक्ष तेलंगाणा राज्याचे सह -सरचिटणीस बनवण्यात आलंय. त्यांचे कार्यालय वारंगल येथे असेल. त्याचप्रमाणे, रवींद्र राजू यांची आसाम आणि त्रिपुरासाठी राज्य सरचिटणीस (संघटना) व कार्यालय उभारणीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

भिखूभाई दलसानिया यांची बिहारसाठी राज्य सरचिटणीस (संघटना) म्हणून नियुक्त करण्यात आलंय. पवन साई यांची झारखंडसाठी राज्य सरचिटणीस म्हणून सिद्धार्थन यांची हिमाचल प्रदेशसाठी राज्य सरचिटणीस (संघटना) म्हणून तर रत्नाकर यांची गुजरातसाठी राज्य सरचिटणीस (संघटना) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: दारूच्या एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री? दारूच्या फ्री बॉटलसाठी दुकानांबाहेर रांगा

जमीन हादरली, घरं थरथरली; पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

बनावट औषधांविरुद्ध एफडीएची मोठी कारवाई; चार महिन्यांत ४,२५६ ठिकाणांवर धाडी, १९ कोटींचं औषधं जप्त

विद्यार्थ्यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी

Maharashtra News Live Update: उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT