Bihar Saam Tv
देश विदेश

Bihar: बाबो! महिलेनं एकाच वेळी ४ बाळांना दिला जन्म; बाळांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Bihar News: अनेकदा आपण जुळी मुलं किंवा तीन बाळांचा जन्म झाल्याचं ऐकलं असेल. मात्र, एका आईने एकाचवेळी ४ मुलांना जन्म दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

A 32 year Old Women Give Birth to 4 Child:

आई होणं हे प्रत्येक महिलेच स्वप्न असतं. मातृत्व हे सर्वात मोठ सूख आहे असं मानलं जाते. बाळ झाल्यावर प्रत्येक आईला खूप आनंद होतो. अनेकदा आपण जुळी मुलं किंवा तीन बाळांचा जन्म झाल्याचं ऐकलं असेल. मात्र, एका आईने एकाचवेळी ४ मुलांना जन्म दिला आहे. बिहारमधील अराहमध्ये एका गर्भवती महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला आहे. बाळांच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब आनंदी आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, बक्सर जिल्ह्यातील नैनिजोक पोलीस स्टेशन हद्दीतील नैनिजोर गावात ही घटना घडली आहे. तेथील रहिवासी भरत यादव आणि पत्नी ग्यानती देवी यांना ४ मुले झाली आहेत. ३२ वर्षीय ज्ञानती देवी यांना प्रसुती कळा सुरु झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी एकाच वेळी ४ मुलांना जन्म दिलाय. ही बातमी समजताच यादव कुटुंबाला आनंद झाला. आता संपूर्ण यादव कुटुंब बाळांची काळजी घेत आहे.

एकाच घरात सहा मुले

याबाबत नवजात मुलांचे वडील भरत यादव यांनी सांगितले की, आम्हाला याआधीच एक मुलगा आणि मुलगी आहे. यानंतर आता चार मुलांचा जन्म झाला आहे. चारही मुले आहेत. ही माहिती मिळताच आम्हाला खूप आनंद झाला. प्रसुतीनंतर आई आणि बाळ सुखरूप आहे. एकत्र चार मुलांचे संगोपन करताना नक्कीच अडचण येईल. मात्र, आम्ही दोघे मिळून त्यांची उत्तम काळजी घेऊ. याशिवाय घरातील इतर मंडळीदेखील आनंदी आहेत. आईला थोडे प्रोब्लेम्स येतात. एकाच वेळी चार मुलांना भूक लागल्यावर दूधाची समस्या येते. परंतु आम्ही काळजी घेऊ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhai Dooj 2025: आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

Bhaubeej Marathi Wishes: भाऊ-बहिणीच्या नात्याचा खास सण! लाडक्या भाऊरायाला पाठवा 'या' खास शुभेच्छा

Budh Gochar: उद्या बुध ग्रह करणार राशीत बदल; दिवाळीमध्ये 'या' 3 राशींची होणार चांदीच चांदी

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

SCROLL FOR NEXT