Bihar News  Saam Tv
देश विदेश

Bihar News : शाळेत मधल्या सुट्टीत जेवल्यानंतर पोट दुखू लागलं, उलट्या झाल्या; ५० मुलं रुग्णालयात

Bihar School News: शाळेत माध्यान्ह भोजनानंतर प्रकृती बिघडल्यानं ५० विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bihar School Mid Day Meal Affect Students Health

शाळेत माध्यान्ह भोजनानंतर प्रकृती बिघडल्यानं ५० विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. बिहारमधील सितामढी येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी हा प्रकार घडला.

एका अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली. सीतामढी येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी माध्यान्ह भोजनानंतर मुलांच्या पोटात दुखायला लागलं. त्यांना उलट्यांचा त्रासही होऊ लागला. त्यानंतर त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करावं लागलं. मुलांवर तात्काळ उपचार करण्यात आले.

सीतामढी जिल्ह्यातील डुमरा विभागात प्राथमिक शाळेत मंगळवारी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात आलं. त्यातील ५० मुलांची प्रकृती बिघडली. मुलांच्या पोटात दुखू लागले. तसेच काहींनी उलट्या केल्या, असं वृत्त एएनआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले.

विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या सर्व मुलांची प्रकृती आता स्थिर आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

जेवणात पाल असल्याचा दावा?

माध्यान्ह भोजनातून दिलेल्या अन्नात पाल असल्याची तक्रार मुलांनी केली आहे, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. हेच अन्न या सर्व मुलांनी खाल्लं. त्यामुळं त्यांना त्रास होऊ लागला.

सर्व मुलांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्यासोबत असून, काळजी करण्याचे कारण नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morcha: रिक्षा- कॅब चालकांचा मुंबईत एल्गार! आझाद मैदानावर धडक मोर्चा; काय आहेत प्रमुख मागण्या?

Sabudhana Khichdi: रोजची साबुदाणा खिचडी होईल आणखी टेस्टी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांच निधन

भयंकर! शायनिंग मारायला गेला अन् ट्रेनच्या खाली चिरडला, २ किमीपर्यंत फरफटत गेला, पण... व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल

India First Car: भारतात पहिली कार कधी आली? जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT