Bihar Crime News Saam tv
देश विदेश

Bihar Crime News: ६ इंच जमिनीसाठी BSAP जवानाची हत्या; पोलिसांना कॉल करूनही नाही आले, परिसरात पसरली दहशत

बिहारच्या मुजफ्फरपूर येथील एका व्यक्तीने ६ इंच जमिनीच्या वादातून बिहार पोलिसाच्या जवानाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Vishal Gangurde

Bihar News: बिहारमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. बिहारच्या मुजफ्फरपूर येथील एका व्यक्तीने ६ इंच जमिनीच्या वादातून बिहार पोलिसाच्या जवानाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे . (Latest Marathi News)

बिहारमधील (Bihar) कांटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ५३ वर्षीय दीपेंद्र कुमार सिंह हे बिहार स्पेशल आर्म्ड पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांची पटना येथे ड्युटी होती. दीपेंद्र कुमार सिंह सुटी घेऊन मुजफ्फरपूर येथील मूळगावी आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा शेजाऱ्याशी ६ इंच जमिनीवरून वाद सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जवान दीपेंद्र कुमार सिंह गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी कॉल करून या प्रकरणाची माहिती देत होते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही. या ६ इंच जमिनीवरून झालेल्या वादातून शेजाऱ्याने BSAP जवानाला बेदम मारहाण करून हत्या केली. हत्येनंतर जवानाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. गावकऱ्यांनी NH-27 हायवे रोखत आरोपीच्या अटकेची मागणी केली.

या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांच्या आक्रोशाला शांत केलं. त्यानंतर जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

मृत जवान दीपेंद्र कुमार सिंह यांचा भाचा संजय कुमार यांनी सांगितले की, 'शेजारी राहणारे राहुल, राकेश आणि शिवम यांच्यासोबत ६ इंच जमिनीवरून वाद सुरू होता. या एवढ्या जागेवरून रोजच भांडण व्हायचं. आजही दीपेंद्र शेजाऱ्याशी बोलण्यास गेले, त्यावेळी शेजाऱ्याने बेदम मारहाण करत दीपेंद्र यांची हत्या केली.

डीएसपी पश्चिमी अभिषेक आनंद यांनी सांगितले की, 'कांटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या छंपरा गावात बिहार (Bihar) पोलिसाचे जवान दीपेंद्र कुमार सिंह यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळ आढळून आला आहे. नातेवाईकांनी सांगितले की, 'शेजाऱ्यांसोबत त्यांचं गेल्या काही दिवसांपासून भांडण सुरू होतं. या प्रकरणी पोलिसांनी अनेकदा कॉलही केला. पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ का केली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींवर लवकरच कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

Avocado Benefits: हृदयापासून त्वचेपर्यंत फायदेशीर 'हे' एक फळ; जाणून घ्या ७ फायदे आणि कसे खावे

SCROLL FOR NEXT