पाण्यासाठी रेल्वेतून उतरली अन्... नराधमांनी केला सामूहिक बलात्कार Saam Tv
देश विदेश

पाण्यासाठी रेल्वेतून उतरली अन्... नराधमांनी केला सामूहिक बलात्कार

आरोपीने पीडित मुलीच्या मित्राला हातोड्याचा धाक दाखवून, पळवून लावले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : काही दिवसाअगोदर महाराष्ट्रामधील कल्याण रेल्वे स्थानक परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीला रात्रभर डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. आरोपीने पीडित मुलीच्या मित्राला हातोड्याचा धाक दाखवून, पळवून लावले होते. यानंतर पीडित मुलीला एका पडक्या घरात नेहून तिच्यावर अत्याचाराचा कळस गाठला होता. ही घटना ताजी असतानाच, बिहारची Bihar राजधानी पाटणा Patana याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

हे देखील पहा-

पाटणा रेल्वेस्थानकावर एका तरुणीवर तब्बल १२ नराधमांनी सामूहिक बलात्कार केले आहेत. आरोपींनी बलात्कार केल्यावर, बेशुद्ध अवस्थेतील पीडित तरुणीला नग्नावस्थेत रस्त्याच्या बाजूला टाकून पळ काढला आहे. दुसऱ्या दिवशी काही स्थानिक नागरिकांनी पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळल्यावर ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शुद्धीवर आलेल्या तरुणीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पीडित मुलगी मूळची ओडिशा या ठिकाणील रहिवासी आहे. ती रेल्वेने कानपूरला जात होती. दरम्यान बिहारची राजधानी पाटणा जंक्शनवर पाणी घेण्यासाठी पीडित तरुणी रेल्वेमधून खाली उतरली होती. पण पाणी भरून रेल्वेकडे येईपर्यंत तिची गाडी सुटली होती. यामुळे ती पाटणा रेल्वे स्थानकावर एका बाकड्यावर बसली होती.

पीडित तरुणीला बाकड्यावर एकटे बसलेले बघून एक आरोपी तिच्याजवळ आला आणि काही मदत हवी आहे का... अशी विचारणा केली होती. यावेळी पीडितेने आपली ट्रेन चुकल्याचे आरोपीला सांगितले होते. यावर आपण तुला पुढील ट्रेनमध्ये बसवून देतो, असे आरोपीने तिला सांगितले होते. काही वेळ गप्पा मारल्यावर आरोपीने पीडितेला थंड पेय प्यायला दिले होते. हे शीतपेय प्यायल्यावर पीडित तरुणी बेशुद्ध झाली होती.

त्यानंतर थेट रुग्णालयातच तिल शुद्ध आली आहे. यानंतर पीडित तरुणीने तिच्या बरोबर घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात लपून बसलेल्या एका नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Mobile Password: मोबाईलचा पासवर्ड विसरलात? सर्विस सेंटरला न जाता ‘या’ सोप्या ट्रिकने घरीच करा अनलॉक

Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

Chanakya Niti: लग्नानंतर रोज भांडणं होतायेत? ही ५ कारणं नक्की जाणून घ्या! काहीच दिवसांत जाणवेल बदल

SCROLL FOR NEXT