Bihar E-Voting Saam Tv
देश विदेश

Bihar E-Voting : आता घरबसल्या मोबाईलवरून करा मतदान, बिहारमध्ये देशातील पहिला प्रयोग

Voting App Launch : बिहार राज्यात निवडणुकांमध्ये मतदान केंद्रांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांना घरबसल्या मोबाईलवरून ई - व्होटिंग करता येणार आहे. यासाठी १० हजार मतदारांनी ई - व्होटिंगसाठी नोंदणी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आता मतदान करण्यासाठी कोणत्याही लाईनमध्ये उभं राहावं लागणार नाही. कारण आता घरबसल्या मोबाईल अ‍ॅपवर मतदान करता येणार आहे. होय बिहारमधील निवडणुकीची तयारी तीव्र झाली आहे. निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठी आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. यापूर्वी, एक मोबाइल अ‍ॅप लाँच केला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आता घरबसल्या मतदान करता येणार आहे.

मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांच्या बाहेर लांबच लांब रांगा आपण पाहतो. काही वेळेस मतदान केंद्र शोधाशोधीतही आपला तितकाच वेळ जातो. यावर उपाय म्हणून बिहार मध्ये येत्या निवडणुकांसाठी पर्यायी मार्ग शोधला आहे. बिहार राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी शुक्रवारी घोषणा केली की २८ जून २०२५ रोजी होणाऱ्या सहा महानगरपालिकांच्या नगरपालिका निवडणुकांदरम्यान ई-व्होटिंग केले जाईल. सहा परिषदांमधील नगरपालिका निवडणुकांदरम्यान पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा उद्देश .

मतदान केंद्रांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या लोकांना मतदान सुलभ करणे आहे. बिहार हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे मतदारांना मोबाइल अ‍ॅपद्वारे मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. लोकशाही प्रक्रियेतील हे एक संभाव्य नवीन युग म्हणून पाहिले जात आहे.

ही सुविधा कोणाला मिळणार ?

बिहार राज्यात होणाऱ्या येत्या निवडणुकीत मोबाईल अ‍ॅपद्वारे घरबसल्या मतदान करण्यात येणार आहे. ही मतदानाची सुविधा विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे केंद्रावर जाऊ शकत नाही. ही सुविधा ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, गर्भवती महिला, स्थलांतरित कामगार आणि इतरांसाठी तयार करण्यात आली आहे. दीपक प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार १० हजार मतदारांनी ई - व्होटिंगसाठी नोंदणी केली आहे. ५० हजार मतदार केंद्रावर न जाता ई - व्होटिंगद्वारे ते आपला मतदानाचा अधिकार बजावू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT